‘या’ कारणांमुळे हाताच्या बोटांना येते सूज
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सकाळी झोपेतून उठल्यावर अनेक लोकांच्या हाताच्या बोटांना सूज आलेली दिसते. त्यामुळे काम करताना अनेक अडचणी येतात. हाताला किंवा हाताच्या बोटाला सूज येण्याची अनेक कारणे असतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही समस्या अधिक मोठ्या प्रमाणावर असते. बोटांना सूज येण्याची खालील प्रमुख कारणे असू शकतात.
हाताच्या बोटांवर सूज येण्याची प्रमुख कारणे –
१) आहार – सकाळी उठल्यावर बोटांना सूज बहुतांशी आपला आहार कारणीभूत असतो. शरीराला सहन न होणाऱ्या गोष्टी खाण्यात आल्याने हाताच्या बोटांना सूज येऊ शकते.
२) लिव्हर किंवा किडनीचा आजार – काही लोकांना लिव्हर किंवा किडनीचा आजार असू शकतो त्या कारणानेही ही समस्या निर्माण होऊ शकते.
३) अती काम केल्याने – कधी कधी अती काम केल्यानेही हाताच्या बोटांना सूज येते. कारण हाताची बोटे ही शरीरातील इतर अवयवांपेक्षा अधिक काम करत असतात.
४) अतीप्रमाणात व्यायाम केल्याने – अतीप्रमाणात व्यायाम केल्यानेही हाताच्या बोटांना सूज येऊ शकते.