पुरूष ३ दिवसात पडतो प्रेमात, महिलांना लागतात १४ दिवस ! वाचा १५ ‘रंजक’ गोष्टी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मानसिकतेबाबत आणि रोजच्या व्यवहारातील काही मानसशास्त्रीय गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्राचे अभ्यासक यांनी केलेल्या संशोधनावरून काही अशा बाबी समोर आल्या आहेत, ज्या अनेकांना माहित नाहीत. एखादा पुरुष अवघ्या तीन दिवसांमध्ये महिलेच्या प्रेमामध्ये पडतो. त्याउलट महिलेला मात्र पुरुषाच्या प्रेमामध्ये पडण्यासाठी सरासरी १४ दिवसांचा वेळ लागतो. ही बाब स्त्री-पुरूषांच्या मानसिक स्थितीशी संबंधित आहे. अशाच काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

मानसशास्त्रातील रंजक गोष्टी

स्त्री-पुरूष जेव्हा उत्कट प्रेमभावनेने एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात, तेव्हा त्या दोघांच्या हृदयाचे ठोकेसुद्धा एकाच वेळी पडत असतात.

वीस सेकंद मिठी मारल्यास ऑक्सिटॉसिनची निर्मिती होते. यामुळे तुम्ही एखाद्यावर अधिक विश्वास ठेऊ शकता.

अनपेक्षित फोन अथवा मेसेज एखाद्या व्यक्तीचा मूड बदलण्यास सर्वाधिक फायद्याचा असतो.

तुमच्या मृत्यूच्या दिवशी जगातील १, ५९, ६३५ लोकांचा मृत्यू होणार आहे.

रात्री उशीरा एसएमएसद्वारे चर्चा करताना लोक जास्त भावनिक चर्चा करतात. आणि एखादी कबुली सुद्धा देतात.

मानसशास्त्रज्ञांच्या मते जी महिला जास्त प्रमाणात ऑनलाइन गेम खेळत असते ती जीवनातील नात्यांमध्ये अधिक आनंदी असते.

लक्षात ठेवा, हुशार लोक अधिक वेगाने विचार करत असतात, म्हणून त्यांचे अक्षर अधिक आकर्षक अथवा सुंदर नसते.

एखादा व्यक्ती जेव्हा प्रेमात पडण्याच्या विचारानेच घाबरतो त्यास फिलोफोबिया म्हणतात.

एखादे कपल जेवढा जास्त वेळ सोबत घालवते तेवढे त्यांच्यातील प्रेम व्यक्त करण्याचे प्रमाण कमी होते.

१० आपल्या वेदनांना चेहऱ्यावर हास्य आणून त्यामागे लपविणाऱ्या व्यक्तीस इसेडेंटेसियास्ट असे म्हणतात.

११ मानसशास्त्रज्ञांच्या मते, मैत्री ७ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकते तेव्हा ती जन्मभर कायम राहते.

१२ पुरूष अवघ्या तीन दिवसांत महिलेच्या प्रेमात पडतो. परंतु , महिला पुरूषाच्या प्रेमात पडण्यासाठी सरासरी १४ दिवस लागतात.

१३ आपले शरीर पहाटे ३ ते ४ दरम्यान सर्वात अशक्त झालेले असते. झोपेत मृत्यू याच कालावधीत येतो.

१४ हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीची आठवण येईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाची असेल.

१५ झोपेत आपण स्वप्न पाहून दचकून उठतो त्यास हिप्निक जर्क म्हणतात.