आरोग्यानामा ऑनलाइन टीम – मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर आणि संरक्षण याची सांगड आहे. डोळे हा नाजूक भाग असल्याने त्यावर असलेल्या पापण्या डोळ्यामध्ये बारीक कचरा जाण्यापासून संरक्षण करतात. हाताची बोटे, पंचेंद्रिये या सर्वांच्या बाबतीत हेच दिसून येते. मानवी शरिराची काही अशी वैशिष्ट्ये आहेत जी जाणून घेतल्यास कुणालाही आश्चर्य वाटेल. मानवी शरीराशी संबंधित अशाच काही आश्चर्यकारक आणि रंजक गोष्टी जाणून घेवूयात.
हे माहित आहे का?
* एका व्यक्तीच्या तोंडात आयुष्यभरात २५ हजार लिटर लाळ तयार होते.
* मानवी शरीरात एवढे आयर्न असते की एक तीन इंच लांबीचा रॉड तयार होऊ शकतो.
* संपूर्ण जगात जेवढे लोक आहेत तेवढेच बॅक्टेरिया आपल्या तोंडात असतात.
* मानवी डोळे डिजिटल कॅमेरामध्ये बसवले तर त्याची क्षमता ५७६ मेगापिक्सल एवढी प्रचंड होऊ शकते.
* मानवी शरीराचा सर्वात टणक भाग हा जबडा असतो.
* फिंगर प्रींटप्रमाणे प्रत्येकाची जीभही वेगळी असते.
* मानवाचे नाक ५० हजार प्रकारचे वास ओळखू शकते, त्यातील फरक जाणू शकते.
* मानवी शरीराच्या त्वचेतून दर तासाला ६० लाख सेल्स निघतात.
* १ लाख मैल एवढी रेषा मारता येईल एवढे रक्त एका व्यक्तीच्या शरीरात असते.
* मानवाचे नाक आणि कान यांची वाढ आयुष्यभर सुरू असते.
* एक व्यक्ती जागेपणात दिवसभर एवढी उर्जा उत्सर्जित करतो की एक बल्ब पेटू शकतो.
* निळे डोळे असणारे लोक जास्त मद्यपान करू शकतात.
* मानवी डोळे हे एक कोटी रंगांमधील फरक ओळखू शकतात.
* मानवी शरीरात आढळणारे सर्व बॅक्टेरिया एकत्र केले तर त्यांचे वजन समारे दोन किलो असू शकते.
* मानवी शरीरात दररोज एक लीटर कफ तयार होतो.
* मानवाला शंभर प्रकारचे कँसर होऊ शकतात. शिवाय शरीराच्या कोणत्याही भागात कँसर होऊ शकतो.
* मानवी हाडामध्ये पाण्याचे प्रमाण ३१ टक्के असते.
* आपले हृदय दररोज एवढी उर्जा तयार करते की यामुळे एखादा ट्रक ३२ किमी प्रवास करू शकतो.