आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्याकडे पुरातन काळापासून विविध अत्तरांचा वापर केला जात आहे. आता यामध्ये खूप बदल झाला असून विविध प्रकार आले आहेत. प्रत्येकाची सुगंधाची आवड वेगळी असते. जो सुगंध आपल्याला खूप आवडतो तो नियमित वापरण्याकडे बहुतांश जणांचा कल असतो. सगुंधाकडे प्रत्येक व्यक्ती आकर्षित होते.
स्त्री आणि पुरुषांमध्ये विविधप्रकारच्या परफ्यूमचा सर्रास वापर केला जातो. या सुगंधाचा इतरांवर प्रभाव देखील पडतो. त्यामुळेच अपोजिट जेंडरच्या व्यक्तिला आकर्षित करण्यासाठी सुगंधी अत्तरांचा वापर केला जातो. शरीराच्या याच सुगंधावरून तुमचे व्यक्तिमत्व समजू शकते.
व्यक्तिच्या शरीराच्या सुगंधावरुन त्याचे व्यक्तिमत्व कसे ओळखावे, हे एका संशोधनातून समोर आले आहे. पोलंडच्या शास्त्रज्ञांनी या संशोधनाला मान्यता दिली आहे. या संशोधनात १०० महिला आणि १०० पुरुषांना सलग तीन रात्री एका विशिष्ट प्रकारचे कपडे घालण्यात आले. त्यानंतर एका परीक्षकामार्फत त्यांच्या व्यक्तित्वाची चाचणी करण्यात आली. त्यात परिक्षकाने त्यांच्या सुगंधानुसार त्यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे ओळखले. या संशोधनाची विस्तृत माहिती युरोपातील जर्नल ऑफ पर्सनॅलिटी मध्ये प्रकाशीत करण्यात आली आहे.