आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या स्मार्टफोनचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी लहान मुलांच्या हातात देखील पालक स्मार्टफोन देत असल्याने त्यांनाही याचे व्यसन लागल्याचे दिसते. तसेच तरूणांमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे. हातात मोबाईल असलेले असंख्य लोक आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतात. अनेक गोष्टी स्मार्टफोनमुळे सुलभ, सोप्या केल्या असल्या तरी कोणतीही गोष्ट विशिष्ट मर्यादेपर्यंतच लाभदायक असते. स्मार्टफोनचे सुद्धा तसेच आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराचे महाभयंकर तोटेही आता समोर येऊ लागले आहेत.
हे आहेत 6 धोके
1) डीएनएवरही स्मार्टफोनचे रेडिएशन परिणाम करतात. यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते.
2) झोपेचे वेळापत्रक बिघडते. त्यासंबंधीचे विकार जडतात.
3) अल्झायमर, पर्किन्सन्स आणि मेंदूचे विकार वाढीला लागतात.
4) स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे टिनेज मुलांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचे प्रमाण तब्बल ४०० टक्क्यांनी वाढू शकते.
5) कोवळ्या वयात मुलांची कवटी तुलनेने विकसित झालेली नसते. मोबाईलच्या रेडिएशनचा थेट त्यांच्या मेंदूवर प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.
6) प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही स्मार्टफोनच्या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकुल परिणाम होतो.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)