आरोग्यनामा ऑनलाइन टीम – व्यायाम करणे हे आरोग्यास उत्तम मानले जाते. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला व्यायाम करायचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का लहान मुलांनी व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी? तसेच लहान मुलांना कशा प्रकारे फायदा होतो या व्यायामाचा. चला जाणून घेऊ
लहान मुलांसाठी सूर्यनमस्कार हे आदर्श व्यायाम मानले जाते. अशा व्यायामामुळे शरीर हलके होते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते. तसेच पचनशक्ती वाढण्यासही मदत करते कारण या व्यायामामुळे शरीरात अग्नी प्रज्ज्वलित होतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचेही नीट पचन होऊन प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. व्यायाम केल्यामुळे शरीरात साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते. आज कालची मूल मैदानी खेळ खेळत नसल्याने त्यांच्यात चरबी वाढण्याचे प्रमाण जास्त होत आहे. म्हणून अशा वेळी व्यायाम उत्तम उपाय आहे.
व्यायाम करण्याआधी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणजे व्यायाम करण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी काहीही खाऊ नये. कारण खाल्यानंतर लगेच व्यायाम केल्यास शरीराला अतिशय त्रासदायक ठरू शकते. व्यायाम हे नियमित आणि योग्य त्या प्रमाणात करावा. प्रत्येक मुलाने त्याच्या वयाप्रमाणे व्यायामाचे प्रकार ठरवावा. त्यातल्या त्यात सकाळच्या वेळी व्यायाम करणे हे अधिक फायदेशीर असते. खूप घाम निघेल अशा प्रकारचे व्यायाम लहान मुलांनी करणे टाळावे.