शरीराचा भार असणाऱ्या मांड्या अशा पद्धतीने ठेवा मजबूत
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराचा संपूर्ण भार हा मांड्यांच्या स्नायूंवर असतो. त्यामुळे मांड्या मजबूत असणे खूप गरजेचे आहे. मांडी हा शरीरातील महत्वाचा भाग आहे. मांड्यांच्या स्नायूंच्या बळकटीसह टोनिंग करणेही महत्त्वाचे आहे. यामुळे मांड्यांना योग्य आकार प्राप्त होतो आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते. मांड्यांसाठी फायदेशीर असलेले व्यायाम यासाठी करणे गरजेचे आहे.
मांड्या मजबूत आणि योग्य आकारात राहण्यासाठी रिव्हर्स लंजेस हा व्यायाम प्रकार खूप परिणामकारक आहे. तो करण्यासाठी कमरेच्या बरोबरीने दोन्ही पाय ठेवत दोन्ही हातांमध्ये डंबेल्स पकडून जमिनीवर सरळ उभे रहा. आता डाव्या पायाने मागे सरकत गुडघा वाकवा. जेव्हा उजवी मांडी जमिनीच्या समांतर येईल तेव्हा थांबा. असे करत असताना डावी मांडी जमिनीपासून एक इंच वर असली पाहिजे. आता आधीच्या स्थितीत या आणि असे पुन्हा करावे.
तर दुसरा व्यायाम प्रकार करण्यासाठी दोन्ही पाय खांद्याच्या बरोबरीने ठेवत उभे रहावे. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन जावे आणि पाठ सरळ ठेवत दोन्ही गुडघे वाकवावे. जेव्हा दोन्ही मांड्या जमिनीच्या समांतर येतील तेव्हा थांबावे आणि पुन्हा आधीच्या स्थितीत यावे. असे पुन्हा-पुन्हा करावे