आरोग्यनामा ऑनलाइन- अनेक जणांना प्रवासात झोप लागत नाही. यामुळे जागरण होते. शिवाय, पुढील कामांवरही त्याचा परिणाम होतो. विशेषता बाहेर फिरण्यासाठी गेल्यास याचा अधिक त्रास होतो. प्रवासात शांत झोप लागण्यासाठी काही उपचार केल्यास चांगली झोप मिळू शकते.
यासाठी प्रवासात आरामदायी वाटेल अशा स्थितीत राहिले पाहिजे. चेहरा रिलॅक्स ठेवल्यास शरीराला सर्व काही सुरळीत असल्याचे संकेत मिळतील आणि स्ट्रेस कमी होऊन झोपणे सुरक्षित असल्याचे जाणवेल. डोळे बंद करा आणि चेहऱ्यावरील कपाळ स्नायू रिलॅक्स करा. हे केल्यानंतर तुम्ही हळूहळू श्वास घेण्यास सुरुवात कराल आणि आपोआप तुम्हाला झोप लागण्यास सुरुवात होईल.
तणाव असताना त्याचा खांद्यावर परिणाम जाणवतो. यासाठी तर मेंदूदीर्घ श्वास घ्यावा आणि खांदे हळुवारपणे खाली करावे. यामुळे हात आणि पायांदेखील रिलॅक्स होतात. शरीरावरील ताण दूर झाल्यानंतील विचारही कमी करा जेणेकरून मन शांत होईल. झोपण्याच्या आधी काही विचार करत असला तर शरीराची हालचाल होत राहते.