आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडल्यास रात्री झोप न येण्याची समस्या होऊ शकते. झोप न येण्याची ज्यांना कायमची समस्या असते, त्याचे मुख्य कारण हार्मोन्समध्ये होणारे उत्परिवर्तन होय, असे अमेरिकेच्या रॉकफेलर विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी म्हटले आहे.
ही आहेत कारणे
१) हार्मोन्सच्या बदलाचा परिणाम बॉयोेलॉजिकल क्लॉकवर म्हणजेच जैविक वेळेवर होतो.
२) बॉयोेलॉजिकल क्लॉकवर रात्री परिणाम झाल्याने झोप येण्याची आणि सकाळी उठण्याची अवस्था विस्कळीत होते.
३) ७५ पुरुषांमागे एका व्यक्तीस ही समस्या आहे, असेही संशोधनात म्हटले आहे.