आरोग्यनामा ऑनलाइन टीम – झोप घेण्याच्या दोन पद्धती असून एक तर व्यक्ती लार्क म्हणजेच चातक पक्षाप्रमाणे झोपते किंवा घुबडाप्रमाणे झोपते. या झोपण्याच्या पद्धती असून यांचा प्रभाव आरोग्यावर पडतो. एका संशोधनानंतर संशोधकांनी हा निष्कर्ष मांडला आहे. रात्रीच्या १० वाजताच झोपायची इच्छा होत असेल आणि पहाटेच्या पहिल्या सूर्यकिरणांसोबत जाग येत असेल तर तुम्ही लार्क म्हणजेच चातक पक्षाप्रमाणे आहात.
तुम्ही जर रात्र होताच अँक्टिव्ह होत असाल आणि सकाळी उशिरापर्यंत गाढ झोप घेत असाल तर तुम्ही घुबड या प्रमाणे आहात. हे संशोधन करणाèया संशोधकांनी सांगितले की, गायनाची आवड असणारी एक व्यक्ती रात्री लवकर झोपू शकत नव्हती. या व्यक्तीने लागोपाठ दोन ते तीन दिवसांपर्यंत जागरण केले होते.
सरे विद्यापीठाच्या संशोधकांच्या मते, चातक किंवा घुबड यांच्यातील फरक एक प्रकारच्या जीनद्वारे कळतो. या जीनचे दोन व्हर्जन असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. एक व्हर्जन लांब तर दुसरा लहान असतो. तुम्ही चातक या प्रकारात मोडणारे असाल तर तुम्हाला लवकर थकवा येतो. कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
जर तुम्ही घुबड या प्रकारात मोडणारे असाल तर तुम्हाला जास्त भूक लागते. तुम्ही झोपेत घोरता. स्मरणशक्ती चांगली नसते. वेदना जास्त होतात आणि तुम्हाला लव्ह लाइफ चांगली नसते. घुबड प्रकारात मोडणारे लोक म्हणजे मौजमस्तीची हमी असते. मात्र, हे लोक फन-लिव्हिंग असतात. पण, ते डिप्रेशनमध्येही लवकर जातात, असे संशोधकांनी म्हटले आहे. आपल्याला पीरियड-३ जीन्सचा एक व्हर्जन वडील आणि एक व्हर्जन आईकडून मिळतो. सर्वांमध्ये काही वैशिष्ट्ये चातकाची आणि काही घुबडाची असतात. चातक आणि घुबड असे दोन्हीही जीन्स असणारे लोक फार कमी आहेत.