आरोग्यनामा ऑनलाईन टीम- उशिरापर्यंत बाहेर थांबणे, ऑफिसमध्ये खूप वेळ थांबणे, रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलणे आणि व्हाट्सअप, फेकबूकचा जास्त वेळ वापर करणे यामुळे काही पुरुष रात्री खूप उशिरापर्यंत जागत असतात. या अवेळी झोपण्याने अनेक आजार तोंडवर तर काढतातच पण यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकत्वची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुरुषांनी रात्री उशिरापर्यंत जागणे हे त्यांच्यासाठी धोक्याचे होऊ शकते.
रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे अपचन, डोळ्याखाली काळी वर्तुळे, भूक कमी लागणे, चिडचिड होणे या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपले आरोग्य तर बिघडतेच पण नपुसंकत्वची समस्याही निर्माण होते. यामुळे कुटुंब विस्ताराचे प्लनिंग करत असणाऱ्या पुरुषांनी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे.
कारण नुकत्याच लागलेल्या एका शोधानुसार रात्री उशिरा झोपणाऱ्या पुरुषांमधील त्यांच्या शुक्राणू म्हणजे स्पर्मची गुणवत्ता बिघडते. तसेच मागील अनेक संशोधनानुसार झोप पुरुष आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकते हे स्पष्ट झालेले आहे. कारण अनिद्रा हे शुक्राणू पतनाचे मूळ कारण आहे.
व्यवस्थित झोप न झाल्यामुळे पुरुषांना जास्त ट्रेस जाणवतो. आणि याचा परिणाम त्यांच्या पौरुष क्षमतेवर होतो. त्यामुळे पुरुषांनी रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता वाढते. आणि त्यांची प्रजनन क्षमता सुरळीत होते.