आरोग्यनामा ऑनलाइन – दिवसभर धावपळ केल्याने आणि आधूनमधून बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने अनेकजण रात्री उपाशीपोटीच झोपतात. लठ्ठपणा टाळण्यासाठी असे केले जाते. परंतु, अशा प्रकारे उपाशी पोटी झोपल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. अनेकांना समज असतो की, रात्रीच्यावेळी शरीराला अन्नाची गरज नसते. मात्र, शरीर २४ तास एनर्जी प्रोड्यूस करत असते आणि प्रत्येकवेळी कॅलरी बर्न करण्याचे काम करते. त्यासाठी शरीराला न्यूटिएंट्सची गरज असते. जे झोपण्यापूर्वी प्रोटीन शेकचे सेवन करतात. ते इतरांच्या तुलनेत जास्त एनर्जेटिक असतात. तर उपाशी पोटी झोपल्याने दुसऱ्या दिवशी थकवा जाणवू लागतो.
रात्री उपाशीपोटी झोपल्याने मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम होतो. शरीरातील इन्सुलिनच्या प्रमाणावरही परिणाम होतो. तसेच उपाशी पोटी झोपल्यामुळे कोलेस्टॉल आणि थायरॉइड लेव्हलवरही परिणाम होतो. या सवयीमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. रात्री अचानक भूक लागल्यामुळे पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो. ज्यामुळे झोपही पूर्ण होत नाही. शांत झोप हवी असेल तर उपाशी पोटी झोपू नका. रात्री उपाशीपोटी झोपल्यास वजन लवकर कमी होते असा अनेकांचा गैरसमज आहे.
रात्रीच्या आहारात पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश करावा. परंतु, न खाता झोपल्याने आरोग्याला नुकसानासोबतच वजनही कमी होते. रात्री उपाशी झोपल्याने शरीरामध्ये न्यूटिशन्सची कमतरता जाणवते. उत्तम आरोग्यासाठी शरीराला अनेक न्यूटिएंट्सची गरज असते. परंतु रात्री उपाशीपोटी झोपल्याने व्यक्तीच्या शरीरामध्ये सर्व न्यूटिएंट्स कमतरता भासून आजारांनी आपण बळी पडतो.