वजन घटवायचंय… मग शांत झोप घ्या !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन वाढीचा आणि खाण्याचा सवयींचा हमखास संबंध जोडला जातो. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिम , व्यायाम , खाण्यावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या पद्धतींचा अवलंब  करताना दिसतात. मात्र अनेकांना हे माहीतच नसते की पुरेशी शांत झोपही वजन घटविण्यासाठी आवश्यक आहे.

झोपेचा आणि वजनाचा संबंध –

ज्या व्यक्तींची झोप आणि नियमित असते त्या व्यक्तींची शरीरातील ऊर्जा  खर्च करण्याची क्षमता, झोप अनियमित असणाऱ्या व्यक्तींपेक्षा जवळपास २० टक्क्यांनी अधिक असते. ज्या व्यक्तींच्या झोपेच्या आणि झोपेतून उठण्याच्या वेळा निश्चित असतात, त्या व्यक्तींच्या शरीरातील उर्जा किंवा कॅलरीज झोपेमध्ये देखील वापरल्या जात असतात.अनियमित झोप असणाऱ्या व्यक्तींच्या शरीराचा मेटाबोलिक रेटही कमी असतो, त्यामुळे गरजेपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना  वजन घटविणे सहजा सहजी शक्य होत नाही त्यामुळे रात्रीचे जागरण शक्यतो टाळा.


तसेच रात्री शक्यतो अंधार असलेल्या खोलीमध्ये  झोपण्याला प्राधान्य द्या कारण संपूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपणाऱ्या व्यक्ती जाड होण्याची संभावना कमी असते. प्रकाशामध्ये  झोप लागणे अशक्य होते. रात्री झोप उशिरा लागल्याने शरीराला अपुरी विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही थकवा जाणवत राहतो. झोपेच्या नियमित सवयीमुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेली विश्रांती आपल्याला मिळते व वजन घटविण्यासाठीही मदत होते.