ही काळजी घेतली तर चेह‍ऱ्यावर पडणार नाहीत सुरकुत्या

wrinckle

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. मात्र, अनेकदा कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्वचेची तन्यता कायम राहण्यासाठी कोलेजन हा घटक महत्त्वाचा असतो. याच्या कमतरतेमुळे शरीरावर सुरकुत्या पडू लागतात. कोलेजन हा त्वचेबरोबर हाडे, स्नायू, कार्टिलेज आणि अंतर्गत अंग, दात या ऊतींना मजबूत करण्यासाठी गरजेचा असतो.
जास्त वेळ उन्हात राहणे, शरीरात फ्री रॅडिकल्सची निर्मिती होणे आणि दूषित वातावरणातील विषारी घटकांमुळे कोलेजनचे नुकसान होते.

फॅटयुक्त खाद्यपदार्थांचे अतिसेवन आणि धूम्रपान, दारू अशा वाईट सवयींमुळे कोलेजनला धोका पोहोचतो. आर्थरायटिससारखे आजार किंवा त्वचा संक्रमणामुळेही कोलेजन तुटण्याची प्रक्रिया सुरू होते. ही समस्या टाळण्यासाठी वरील काळजी घेतल्यास सुरकुत्या पडणार नाहीत. सुरकत्या पडणे हे वयस्कपणाचे लक्षण असून चांगल्या व्यक्तिमत्वात हा मोठा अडसर होऊ शकतो. म्हणून याबाबत सांगितलेली दक्षता घेणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यास चेहरा खराब होतो. आकर्षक चेहऱ्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी ही काळजी घेणे खुप आवश्यक आहे. वय झालेले नसताना सुरकुत्या पडणे हे जास्त त्रासदायक ठरू शकते.