आरोग्यनामा ऑनलाइन – वाढते वय, आवश्यक प्रोटीनची कमतरता, सूर्यप्रकाशाची कमतरता, चुकीच्या पद्धतीने वजन कमी करणे, इत्यादी करणांमुळे त्वचा सैल होते. सैल त्वचा टाइट करण्यासाठी लोक उपाय शोधत असतात. काही घरगुती पद्धतीने या समस्येवर कशाप्रकारे उपाय करता येईल हे जाणून घेवूयात…
हे आहेत उपाय, सुरकुत्या होतील दूर
1 मालिश करा
मालिश केल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि फायब्रोब्लास्ट उत्तेजित होते. या अशा पेशी असतात ज्या कोलेजन आणि इलास्टिन ऊती बनवण्यात मदत करतात. मालिश सोबत अँटी-एजिंग क्रीमचा वापर करा.
2 पोषक तत्वांचा आहार
सुरकुत्या कमी करण्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, डी, आणि ई, एंजाइम, सेलेनियम आणि झिंक अँटीऑक्सिडेंट असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
3 एक्सरसाइज
वेट आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग एकाचवेळी केल्याने मांसपेशी मजबूत होतील. शिवाय फॅट सुद्धा कमी होईल.
4 योग आणि पिलेट्स
योगा आणि पिलेट्स दोन्हीमुळे मांसपेशी मजबूत आणि टोंड होतात. त्वचा टाइट होते. तज्ज्ञांकडून यासाठी प्रभावी योगासन शिकून घ्या.
5 हायड्रेटेड रहा
त्वचा ओलसर ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करा. शरीरात पेय आणि जेवणाच्या माध्यमातून भरपूर पाण्यावर भर द्या.
6 घरगुती उपाय
* काकडी – या भाजीत पाणी भरपूर असल्याने त्वचा टोन होते. याचा रस त्वचेवर रगडा.
* लिंबू – बाहेरून वापरल्याने कोलेजन उत्पादन वाढते, त्वचा टोंड होते. लिंबूपाणी प्या.
* एलोवेरा – हे मॉइस्चरायजरचे काम करते. सैल त्वचा टाइट करण्यासाठी गुणकारी आहे.
7 रेडियोफ्रीक्वेन्सी ट्रीटमेंट
त्वचेच्या सुरकुत्यांवरील उपचारासाठी विना-इनव्हेसिव ट्रीटमेंटमध्ये रेडियोफ्रीक्वेंसी सर्वांत जास्त प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे.
8 स्विमिंग
पोहण्याच्या व्यायामामुळे मांसपेशींची ताकद सुधारते. मजबूत मांसपेशी म्हणजे टोंड त्वचा.