Skin Ccare | थंडीच्या दिवसात अशी घ्या त्वचेची काळजी, प्रॉडक्टची निवड अशी करा

Skin Ccare | on a Winter take care of the skin and select the good product

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Skin Ccare | थंडीच्या दिवसात सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती आपल्या त्वचेची (Skin Ccare). कारण थंड हवामानाचा सर्वाधिक परिणाम हा त्वचेवर होत असतो. त्वचा कोरडी होणे, फाटणे, पांढरी आणि निस्तेज दिसणे अशा समस्या होतात. यामुळे थंडीमध्ये अनेकजण विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स खरेदी करतात. परंतु, कोणते प्रॉडक्ट खरेदी करावे, याची योग्य माहिती नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. यासाठी योग्य ते प्रॉडक्ट कसे खरेदी करावे याबाबत माहिती आपण घेणार आहोत.

लिपबाम
त्वचा कोरडी पडत असल्यास बाहेर पडताना लीप लोशन किंवा लीप बाम लावा. लिपस्टिक लावत असल्यास लीप प्रोटेक्टर म्हणूनही लिपबामचा उपयोग करता येतो. मात्र, कलर लिपबाम खरेदी केल्यास लिपस्टिक वापरण्याची आवश्यकता नसते.
फेसवॉश
हिवाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉशची निवड करावी. कोरड्या त्वचेसाठी क्रिमी फेसवॉश घेवू शकता.
बॉडी लोशन
बॉडी लोशनसुद्धा त्वचेच्या प्रकारानुसार खरेदी करावे. उत्पादनाच्या लेबलवरील माहिती वाचून ते खरेदी करावे. बाष्पशील तेल, वनस्पती अर्क, ईमोलेन्ट याची माहिती तपासावी. यामध्ये फ्रेग्रन्स आणि त्वचेत ओलावा निर्माण करण्यासाठी बाष्प तेल वापरतात.
साबण
चुकीचा साबण वापरल्याने थंडीत त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण जास्त असते.
यासाठी साबणाची निवड करताना त्यामध्ये टीएफएम म्हणजेच टोटल फॅटी मटेरियल किती आहे ते तपासा.
थंडीत जास्त टीएफएम असलेला साबण वापरा

 

हे देखील वाचा

Coronavirus Symptoms | संशोधनात दावा : महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळी असतात कोरोनाची लक्षणे, व्हॅक्सीन घेतलेल्या लोकांनी सुद्धा राहावे सावध

Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी

Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे