https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_62d74f27676ae78ad057d603239c7216.js
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result
Home ताज्या घडामाेडी

Skin Care Tips | चेहरा साफ करताना अनेकदा लोक करतात या 5 चुका , त्वचेसाठी नुकसानदायक

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
January 2, 2022
in ताज्या घडामाेडी, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, सौंदर्य
0
Skin Care Tips | avoid these mistakes while washing your face skin care

file photo

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Skin Care Tips | प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर दिसावे असं कायम वाटत असते. चेहरा सुंदर (Beautiful Face) दिसण्यासाठी लोक त्वचेची खूप काळजी घेतात. अनेक उपाय योजना करतात, परंतु असे असूनही त्यांच्या त्वचेवर मुरुम, सुरकुत्या यासारख्या समस्या वाढतच जातात. जर आपण या समस्यांच्या मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येईल की आपल्याच छोट्या छोट्या चुका त्यांना कारणीभूत आहेत. आपल्या सर्वांची त्वचा वेगळी आहे, काहींची सेन्सिटिव्ह (Sensitive) काहींची कॉम्बिनेशन (Combination) तर काहींची तेलकट (Oily) आणि अनेक वेळा आपण नकळत अशी उत्पादने त्वचेवर वापरतो (Skin Care Tips) जी आपल्या त्वचेला शोभत नाहीत आणि ते दुष्परिणाम दाखवतात. (Avoid These Mistakes While Washing Your Face)

 

स्क्रबिंग (Scrubing ) करून चेहऱ्यावरचे डेड सेल्स (Dead Cells) निघून जातात पण जास्त स्क्रब केल्याने चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरापेक्षा चेहऱ्यावरची त्वचा नाजूक असते. जास्त स्क्रबमुळे त्वचेचे निर्जलीकरण (Dehydration) होऊ लागते आणि पांढरे दाग दिसू लागतात. त्यामुळे स्क्रबींग आठवडयातून एकदाच करावी आणि इतर दिवशी व्यवस्थित चेहरा साफ करावा, डेड स्किन पासून तर सुटका होईलच पण त्वचा जास्त निरोगी आणि मऊ बनेल. (Skin Care Tips)

 

चेहरा धुताना टाळा या चुका
अति गरम पाण्याने चेहरा साफ करणे

चेहऱ्याची त्वचा नाजूक असते, आणि जास्त गरम पाण्याने साफ केल्यास त्वचेतील चमक नाहीशी होऊ लागते. लवकर सुरकुत्या पडू लागतात. त्वचा कोमलपणा गमवू लागते. त्यामुळे साध्या पाण्याने, किव्वा हिवाळ्यात हलक्या कोमट पाण्याने चेहरा साफ करावा.

एकाच टॉवेलने शरीर आणि चेहरा पुसणे
खरं तर, सामान्य घरांमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्ही एकाच टॉवेलने शरीर आणि चेहरा स्वच्छ केला तर ते तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी चांगले नाही. यामुळे टॉवेलमध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्यावर येतात आणि त्वचेवर डाग आणि पिंपल्स येऊ शकतात.

खूप थंड पाण्याने चेहरा साफ करणे
जर तुम्ही खूप थंड पाण्याने (Cold Water) चेहरा धुतलात तर त्वचेची छिद्रे साफ होत नाहीत आणि त्यामुळे चेहऱ्यावर घाण जमा होऊ लागते जी नंतर मुरुमांचे कारण बनते.

 

त्वचेच्या प्रकारानुसार फेसवॉश न निवडणे
आजकाल लोक जाहिरात पाहून किंवा सुगंध आवडल्यानंतर फेस वॉश (Face Wash) विकत घेतात आणि ते चेहऱ्यावर वापरण्यास सुरुवात करतात.
पण असे केल्याने त्वचेला जास्त नुकसान होते. म्हणूनच, नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा आणि वापरा.
बेसन, दही, खोबरेल तेल इत्यादी नैसर्गिक गोष्टींनी चेहरा स्वच्छ केलेला कधीही चांगलाच.

मेकअप सोबतच चेहरा धुणे
कायम मेकअप क्लिनरने मेकअप स्वच्छ केल्यानंतरच चेहरा पाण्याने धुवा.
जर तुम्ही मेकअप न उतरवता फेसवॉश करत असाल तर मेकअपचे पदार्थ नीट उतरणार नाहीत आणि त्यातील रसायने चेहऱ्याच्या त्वचेला खराब करतात.

 

रोज रोज केमिकल पदार्थ चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला खेळती हवा मिळत नाही.
आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा जास्त दिवस निरोगी आणि फ्रेश राहणार नाही.
रात्री झोपताना व्यवस्थित मेकअप क्लिनर ने मेकअप उतरवावा आणि आपल्या चेहऱ्याला सूट होणारे मॉइश्चरायझर आणि टोनर लावावे.

 

या काही टिप्स चा उपयोग करून आपण आपल्या त्वचेला निरोगी आणि प्रॉब्लेम फ्री ठेवू शकतो.

 

Web Title :- Skin Care Tips | avoid these mistakes while washing your face skin care

 

हे देखील वाचा 

Dry Fruits-Immunity | ओमीक्रोनपासून वाचण्यासाठी वाढवा इम्यूनिटी, हे 3 ड्राय फ्रूट्स आहेत उपयोगी

Skin Care Tips | ‘या’ वेळी केले लिंबूचे सेवन तर चमकदार होईल त्वचा, ब्लड प्रेशरमध्ये लाभदायक

Dry Fruits-Immunity | हिवाळ्यात इम्युनिटी वाढवतील ‘हे’ ड्रायफ्रूट्स, सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने दूर होऊ शकतात अनेक आजार

Tags: Avoid These Mistakes While Washing Your FaceBeautiful facecold waterCombinationDead CellsDehydrationface washhealth latest newshealth latest news todayHealth marathi Newshealth news today marathilatest healthlatest marathi newslatest news on healthMakeupoilyRinse face with warm waterScrubingSensitiveSkinskin careskin care tipstodays health newsकॉम्बिनेशनगरम पाण्याने चेहरा साफ करणेचेहरा सुंदरडेड सेल्सतेलकटत्वचाथंड पाणीफेस वॉशमेकअपसेन्सिटिव्हस्क्रबिंग
Health Tips | Health will change completely in 2023, include these 4 foods in your diet plan
ताज्या घडामाेडी

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

by Nagesh Suryawanshi
January 23, 2023
0

आरोग्यनामा ऑनलाइन टीम - Health Tips | भारतीय लोक असा आहार खातात, ज्यामध्ये योग्य प्रमाणात पौष्टिक फळे आणि भाज्यांचा अभाव...

Read more
Normal BP | How much BP should be according to age and female-male calculation, see chart

Normal BP | वय आणि महिला-पुरुषांच्या हिशेबाने किती असावा बीपी, पहा चार्ट

January 23, 2023
Bad Cholesterol | These 5 Ayurvedic Remedies Will Help Lower Bad Cholesterol (LDL), Increase Good Cholesterol

Bad Cholesterol | खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत करतील हे ५ आयुर्वेदिक उपाय, वाढेल गुड कोलेस्ट्रॉल

January 23, 2023
Weight Loss | Drink milky pumpkin soup to reduce obesity, along with many health benefits!

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

January 23, 2023
Diarrhea in Children | Don't ignore the problem of diarrhea in children, know 5 symptoms and treatment

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

January 23, 2023
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021

https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_12a509b063a96161625ad1369bb83aaa.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_c854cc360049fa79f34f56ddfb34a6ce.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_ed3b4417df0895e4cf8465d32b69adc6.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_9855fb5d7dee948d776d7e36ede8a2c9.js
https://arogyanama.com/wp-content/cache/breeze-minification/js/breeze_71ed5d351d462619d0b359f73f22bc2c.js