आरोग्यनामा ऑनलाईन- कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीत जाण्यासाठी महिला अत्यंत उत्साहित असतात. आपल्या ड्रेस बरोबर त्या मेकअपवर विशेष लक्ष देतात. परंतु, मेकअप लावल्यानंतर ते काढून टाकणे देखील खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा त्वचेची समस्या उद्भवू शकते. मेकअप स्वच्छ करण्यासाठी बाजारात बरेच मेकअप काढणारे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत; परंतु महाग आणि रसायनांनी भरल्यामुळे ते त्वचेला नुकसान करू शकतात. सहजपणे नैसर्गिक गोष्टींपासून बनविलेले मेकअप रिमूव्हर वापरुन त्वचा स्वच्छ, सुंदर, मऊ आणि चमकदार बनवू शकता. तसेच आपल्याला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.
आपल्याला घरगुती मेकअप रिमूव्हर तयार करण्याचे ७ मार्ग
१) ऑलिव्ह तेल
ऑलिव्ह ऑइलमध्ये एंटीऑक्सीडेंट्स गुणधर्म असतात, ते त्वचेची खोलवर स्वच्छता करण्यास आणि डाग, सुरकुत्या आणि मुरुमाची समस्या दूर करण्यास मदत करतात. मेकअप रिमूव्हर तयार करण्यासाठी एका भांड्यात २ चमचे ऑलिव्ह तेल आणि १/२ चमचे पाणी मिसळा. तयार रिमूव्हरमध्ये कापूस बुडवून चेहऱ्यावरील मेकअप साफ करा. तसेच हलके हातांनी चेहऱ्यावर मालिश करा. मृत त्वचेच्या पेशी साफ करून वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास हे मदत करतात. त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात, त्वचा स्वच्छ, सुंदर आणि तरुण दिसते.
२) कच्चे दूध आणि बदाम तेल
एका भांड्यात १ चमचा कच्चे दूध आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब घाला. तयार मिश्रणाच्या काही थेंबाने चेहऱ्यावर मालिश करून मेकअप साफ करा. नंतर ते पाण्याने धुवा. पौष्टिक समृद्ध बदाम तेल आणि कच्चे दूध त्वचेच्या मृत पेशी शुद्ध करण्यास आणि नवीन त्वचा प्रदान करण्यास मदत करते. तसेच त्वचा खोल, स्वच्छ, सुंदर, मऊ आणि चमकणारी बनवते.
३) बेबी शाम्पू
मेकअप रिमूव्हर म्हणून बेबी शाम्पू वापरणे देखील एक उत्तम पर्याय आहे. यासाठी एका भांड्यात १ कप पाणी, ८ चमचे ऑलिव्ह किंवा नारळ तेल आणि १/२ चमचे बेबी शाम्पू मिसळा. ते चांगले एकजीव करून नंतर बाटलीमध्ये भरावे. नंतर बाटली हलवा आणि आवश्यकतेनुसार वापरा.
४) काकडी
मेकअप साफ करण्यासाठी आपण काकडी वापरू शकता. यासाठी १ काकडी कापून त्याचे मिश्रण तयार करा. नंतर हे मिश्रण चेहर्यावर लावा आणि हलक्या हातांनी मालिश करा. नंतर ते पाण्याने धुवा. अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल, अँटीएजिंग गुणधर्मांनी भरलेली काकडी चेहरा शुद्ध करून त्वचेला हळूवारपणे स्वच्छ करेल. हे त्वचेचे पोषण करेल आणि डाग दूर करेल तसेच त्वचा स्वच्छ, मऊ आणि कोरडी दिसेल.
५) जोजोबा आणि व्हिटॅमिन-ई तेल
एका भांड्यात ६० मिलीलीटर जोजोबा तेल आणि १ व्हिटॅमिन-ई कॅप्सूल याचे मिश्रण तयार करून घ्या. काचेच्या बाटलीमध्ये तयार मिश्रण भरा. हे वॉटर प्रूफ मेकअप काढण्यासाठी फायदेशीर आहे. हे मेकअप सहजतेने स्वच्छ करते आणि त्वचेला खोलवर पोषण देते. अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध जीवनसत्व ई त्वचेला मऊपणा आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी आहे.
६) दही
दहीमध्ये अँटीऑक्सीडंट, एंटीएजिंग, अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे खाल्याने आणि चेहऱ्यावर लावल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊन नैसर्गिकरित्या चेहरा चमकदार होतो. आपण मेकअप काढण्यासाठी देखील वापरू शकता. यासाठी, १ चमचा दही घ्या आणि चांगले मिश्रण तयार करून घ्या. मग कापसाच्या मदतीने मेकअप स्वच्छ करा. नंतर पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा सुंदर, कोमल आणि चमकदार दिसेल.
७) नारळ तेल
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स असलेले समृद्ध नारळ तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. आपण मेकअप काढण्यासाठी सहजपणे याचा वापर करू शकता. याचा उपयोग करण्यासाठी, या तेलाचे काही थेंब आपल्या हातात घ्या आणि चेहऱ्यावर मसाज करा. आता टिशू पेपरने चेहरा स्वच्छ करा आणि पाण्याने धुवा. यानंतर थोडे तेल घेऊन डोळ्याभोवती मसाज करा. मेकअप काढण्यासाठी आणि नवीन त्वचा येण्यासाठी आणि मृत त्वचेच्या पेशीपासून मुक्त होण्यास हे मदत करेल. आपण हे लिप बाम, मॉइश्चरायझर म्हणून देखील वापरू शकता.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.