आरोग्यानामा ऑनलाईन टीम : गुळ आरोग्यासाठी चांगला असून त्यामुळे अनेक आजार दूर राहतात. यामुळे त्वचा, केस निरोगी राहतात. तसेच यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ यासारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात. यातील आयर्नमुळे केस सुंदर आणि घनदाट होतात. गुळाचे त्वचा आणि केसांसाठी कोणते फायदे आहेत, ते जाणून घेवूयात.
१ सुरकुत्या
रोज गुळासोबत थोडे तीळ खाल्ल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो, सुरकुत्या जातात.
२ डार्क सर्कल्स
गूळ थोडा बारिक करून त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. याला दररोज १० मिनिटांसाठी डोळ्यांखाली लावा. तसेच दररोज थोडा गूळ खा.
३ उजळ चेहरा
गुळामध्ये मध आणि लिंबू मिक्स करून फेस पॅक तयार करा. १० मिनिटपर्यंत चेहऱ्यावर लावा आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा.
४ पिंपल्स
दररोज थोडासा गूळ खाल्ल्याने ही समस्या दूर होतो.
५ केसांची चमक
थोडा गूळ घेऊन त्यामध्ये मुलतानी माती आणि दही मिक्स करून हेयर पॅक तयार करा. हा हेअर पॅक प्रत्येकवेळी केस धुण्याआधी केसांमध्ये अध्र्या तासासाठी लावून ठेवा आणि नंतर केस धुवून टाका.
Visit : arogyanama.com