आरोग्यनामा ऑनलाईन- कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. याव्यतिरिक्त काही जणींना टिकली लावणे पसंत असते. पण काही महिला-तरुणी आवड असतानाही टिकली लावणे टाळतात, यामागील कारण म्हणजे अॅलर्जी. टिकली लावली की अशा महिलांना खूप खाज येते, कधी कधी लाल पुरळ उठतं, लाल अथवा काळसर डाग उठणे आदीसारख्या अॅलर्जीचा सामना करावा लागतो. मात्र तुम्ही काही घरगुती उपाय करून या त्रासापासून मुक्त होऊ शकता आणि तुमच्या आवडीची टिकलीदेखील लावू शकता जाणून घ्या कसे.
तिळाच्या तेलाचा करा वापर –
जर तुम्हाला टिकलीच्या गोंदची अॅलर्जी असेल तर टिकली लावण्यापूर्वी कपाळावर थोड तिळाच तेल लावावे. ज्यामुळे टिकलीचा गोंद तुमच्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही. तिळाच्या तेलाचा थर या गोंदपासून तुमच्या त्वचेच संरक्षण करण्यास मदत करतो. नियमित तिळाचं तेल लावण्यामुळे हळूहळू तुमच्या त्वचेची अॅलर्जी कमी होण्यास मदत होते.
कडूलिंबाचे तेल लावा
कडूलिंबाच्या पानांप्रमाणेच कडूलिंबाचे तेलही तुमच्या सौंदर्यासाठी उत्तम ठरते. कारण यामुळे तुमच्या त्वचेच कोणतंही इनफेक्शन कमी होऊ शकते. जर टिकली लावण्यापूर्वी तुम्ही थोड कडूलिंबाचं तेल कपाळावर चोळळे तर तुम्हाला टिकली लावण्यानंतर येणारी खाज येणार नाही. टिकली मुळे होणारे इनफेक्शन, खाज कमी करण्यासाठी हे अॅंटिसेप्टिक तेल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
कापूर अन् नारळाचे तेल
त्वचेच्या कोणत्याही समस्येवर नारळाचे तेल फायदेशीर ठरते. कारण या तेलात भरपूर प्रमाणेातत अॅंटी ऑक्सिडंट असतात. अॅलर्जीमुळे जर तुम्हाला खाज येत असेल तर नारळाच्या तेलात थोडा कापूर टाका. कापूर विरघळल्यानंतर ते तेल तुमच्या कपाळावर लावा. कापरामुळे तुमच्या कपाळावरील दाह कमी होईल आणि अॅलर्जीदेखील नष्ट होण्यास मदत होणार आहे. नियमित रात्री झोपताना कपाळावर हे तेल लावण्यामुळे तुम्हाला टिकलीमुळे होणारा अॅलर्जीचा त्रास कमी जाणवू लागेल.
जास्त चिकट गोंद असेलेली टिकली वापरू नका –
टिकलीने खाज येत असेल तर अशा लोकांनी टिकलीचा वापर नक्कीच करू नये. मात्र काही खास प्रसंगी, सणसमारंभाला जर तुम्हाला टिकली लावण्याची हौस असेल तर जास्त चिकट गोंद नसलेली टिकली लावावी अन ती देखील थोड्यावेळासाठीच. जास्त काळ टिकली कपाळावर असेल तर तितका वेळ तुमच्या त्वचेला खाज आणि इनफेक्शनचा त्रास होतो.
टिकली ऐवजी कुंकू लावा
जर सर्व उपाय करूनही तुम्हाला टिकली लावल्यावर खाज येतच असेल तर टिकली ऐवजी कुंकवाचा वापर करा. शुद्ध आणि केमिकल विरहित कुंकू वापरण्यामुळे तुम्हाला अॅलर्जीचा त्रास होणार नाही. शिवाय कुंकू लावण्यामुळे तुमचे सौंदर्य अधिकच खुलून दिसण्यास मदत होईल.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.