आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाक घरात अनेक भाज्या गृहिणी वापरत असतात. या भाज्यांचे आपापले विविध गुणधर्म आणि विशेष महत्व असते. टोमॅटो, मिरची, कांदे, बटाटे, काकडी, कोथिंबिर, कडीपत्ता अशा अनेक भाज्या पदार्थांची लज्जत वाढवतात. यापैकी कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. कोथिंबिरीचे नियमित सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. यापैकी सहा प्रमुख फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत प्रमुख फायदे
१. मुरुमांसाठीही कोथिंबीर उपयुक्त आहे. एक चमचा कोथिंबिरीच्या रसात हळद टाकून हे मिश्रण मुरुमांवर लावावे.
२. मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धने आणि साखर टाकून ते पाणी प्यावे.
३. गर्भवती स्त्रिला उलट्यांचा जास्त त्रास होत असल्यास भातामध्ये धनेपावडर घालून खावे.
४. भूक वाढण्यास मदत होते.
५. अतिसार किंवा पचनाच्या अडचणींवर कोथिंबीर उपयुक्त आहे.
६. डोळ्यांची जळजळ, आग होत असल्यास कोथिंबिरीच्या रसाचे १ किंवा २ थेंब डोळ्यात टाका.