हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – तस पाहिलं तर आपल्या हाताला आणि पायाला पाच-पाच च बोटे असतात. परंतु आपण पहिला असेल काही व्यक्तींना पाच पेक्षा अधिक बोटे असतात. त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्यातलं वेगळेपण आपल्याला लगेच जाणवत. आणि आपल्याला असं जाणवत कि याना जास्तीची बोटे आहेत म्हणजे हि यांच्यातील कमतरता आहे. पण हाताला पाच पेक्षा अधिक बोटे असलेले चांगले असतात. हे एका संशोधनातून समोर आले आहे.

हाताला जर पाच पेक्षा अधिक बोटे असतील. तर त्या व्यक्तीला कोणतही काम करणं सोपं जात. हे लंडनच्या इंपेरिअल कॉलेजच्या संशोधनातून समोर आल आहे. ६ बोट असण्याच्या या फायद्यामुळे आता भविष्यात रोबोटलाही पाच पेक्षा अधिक बोट लावली जाऊ शकतात. स्विझर्लंडच्या काही नागरिकांवर आणि जर्मनीतील एक मुलगा आणि त्याच्या आईवर हे संशोधन करण्यात आले आहे.

या ६ बोटांचा माणसाच्या मेंदूवर काही परिणाम होतो का ? किंवा ती शरीराला काही हानी पोहचवतात का ? हा संशोधन करण्यामागचा उद्देश होता. पण या संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे कि, हाताला ६ बोटे असने फायद्याचे असते.

ज्या व्यक्तींना ६ पेक्षा अधिक बोटे आहेत. ते कोणतेही काम एकाच हाताने करू शकतात. म्हणजे बुटांची लेस बांधायची असेल तर आपल्याला दोन हातांचा वापर करावा लागतो. पण ज्यांच्या हाताला ६ बोटे आहेत. त्यांना एकाच हाताने बुटांची लेस बांधता येते. प्रत्येकी ७०० पैकी १ व्यक्तीला ६ बोटे असतात. हि जन्मजातच असतात. जास्तीची बोटे शस्रक्रिया करून काढता येतात.

पण या बोटांमुळे जे आपल्याला फायदा होत असेल तर आपण हि बोटे न काढलेलीच बरी असतात.