आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसाला पाच तासापेक्षा जास्त काळ बसून काम करणारांना वाढत्या वयात मोबिलिटी डिसॅबिलीटीचा अर्थात चालण्याफिरण्याचा त्रास होऊ शकतो, असे अमेरिकेतील वाशिंग्टन विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आले आहे.
हे आहेत धोके
१) पाच तास किंवा त्याहून अधिक काळ बसून काम केल्यास चालणे, हालचाल मंदावते किंवा अगदीच बंद होऊ शकते.
२) जे लोक दिवसाला दोन तासापेक्षा कमी काळ बसून असतात ते जास्त अॅक्टिव्ह असतात. उतारवयातही त्यांच्या हालचाली मंदावत नाहीत, असे इंग्लंडमधील संशोधनात आढळून आले आहे.
३) सध्या सर्वच वयोगटात बैठे काम किंवा बसून राहण्याची सवय वाढलेली असल्याने अनेकांना तरुण वयातच पायदुखीपासून अनेक आजार सतावत आहेत.
हा आहे उपाय
* रोज किमान ३० मिनिटे तरी चालण्याचा व्यायाम करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)