पावसाळ्यात पायांना पडणाऱ्या भेगांपासून ‘अशी’ घ्या पायाची काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात पाय जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे किंवा सारखे चिखलात जावे लागल्यामुळे अनेकांच्या पायाला भेगा पडतात. त्यामुळे पायांचे सौंदर्यही नष्ट होते. त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पाय मुलायम हवे असतील तर तुम्ही काही घरगुती उपायाने भेगांवर उपाय करु शकता.

१) पावसाळ्यात पायांची काळजी घेण्यासाठी बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरल्यास त्याने देखील त्रास कमी होतो. हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

२) लोणी, आंबेहळद आणि मीठ यांचं मिश्रण करून रोज पायांना लावल्यास आराम मिळतो.

३) पायांना भेगा पडल्यास चंदन उगळून भेगांमध्ये त्याचा लेप लावल्याने भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यानेही भेगा कमी होतात.

४) रात्री झोपताना पाय स्वच्छ धुवून मॉईश्चराईज्ड क्रिम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

५) पावसाळ्यात किंवा अन्य कोणत्याही ऋतूत पायाला भेगा पडल्या तर कडूलिंबाचा पाला कुटून त्याचा रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.