तजेलदार त्त्वचेसाठी टोमॅटो उपयोगी, जाणून घ्या सामान्य गोष्टींचे ‘खास गुण’

tomato

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : चेहरा तजेलदार करण्यासाठी बाजारात असलेली अनेक उत्पादने ग्राहकांची केवळ दिशाभूल करत असतात. अनेकदा तर या उत्पादनांचे दुष्परिणामही दिसून येतात. अशा सौंदर्यप्रसाधनांनी चेहऱ्यावर कधी-कधी रिअ‍ॅक्शन येतात. त्यामुळे त्वचा जास्त रुक्ष दिसू लागते. अशावेळी घरगुती उपाय करणे कधीही चांगले आणि फायदेशीर असते. घरगुती उपयांनी चेहऱ्याची चमक वाढते. तसेच ही चमक कायम टिकून राहते.

हे आहेत उपाय

१) टोमॅटोचा रस काढून त्यामध्ये थोडे मध टाकून एकत्र करावे. या मिश्रणाने हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. नियमीत हा उपाय केल्यास चेहरा तजेलेदार होतो.

२) आर्धा किलो दोडके बारिक कापून २ लीटर पाण्यामध्ये उकडून घ्यावे. त्यानंतर पाणी गाळून त्यामध्ये वांगे उकडून घ्यावीत. वांगे शिजल्यानंतर त्यामध्ये तूप विरघळून त्यात गुळ घालून खाल्ल्यास मुळव्याधची समस्या नष्ट होते.

३) दोडक्याचे छोटे-छोटे तुकडे करून सावलीत सुकवून घ्यावेत. सुकलेले तुकडे नारळाच्या तेलात पाच दिवस टाकून ठेवावेत. त्यानंतर तेल गरम करून गाळून घ्यावे. हे तेल दररोज केसांना लावल्यास केस काळे होतात.

४) दोडक्याची पाने आणि बिया पाण्यात बारिक करून त्वचेवर लावावी. त्यामुळे खाज आणि त्वचेवरील डागांपासून आराम मिळतो.

५) सफरचंदाची पेस्ट बनवून त्यामध्ये काही प्रमाणात दूध मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. काहीवेळाने धुवून टाकावी. आठवड्यातून कमीत-कमी चार वेळा असे केल्यास खूप चांगला फरक पडतो.

६) एक विड्याचे पान बारिक करून त्यामध्ये एक चमचा नारळाचे तेल टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. कोणत्याही भागावर काळे डाग असल्यास त्या ठिकाणी लावून नंतर चेहरा धुवून घ्यावा. आठवड्यात दोन ते तीन वेळा हा उपाय करावा. तीन महिन्यांमध्ये काळे डाग नाहिसे होतात.

७) एक बटाटा बारिक करून त्यामध्ये २-३ चमचे दूध घालावे. पेस्ट बनवून दररोज संध्याकाळी काहीवेळ चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावा. काही दिवसांत चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर होते.

८) दररोज ग्लिसरीन आणि लिंबूचा रस समान प्रमाणात चेहऱ्यावरील काळ्या डागांवर लावल्यास चांगला फायदा होतो.

९) १/२ कप पत्ता कोबीचा रस तयार करा. त्यामध्ये १/२ चमचे दही आणि १ चमचा मध घालून चेहऱ्यावर लावा. काहीवेळानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. यामुळे त्वचा टवटवीत होते आणि सुरकुत्या दिसत नाहीत.

१०) रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या २ चमचे रसात २ चमचे मध टाकून मिश्रण बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर २० मिनीटांपर्यंत लावून ठेवावे. त्यानंतर दूधाने चेहरा स्वच्छ करावा.

११) एक बटाटा बरिक किसून घ्यावा. त्यामध्ये २/३ चमचे दूध घालून त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सपासून सुटका मिळते.

१२) अपचन आणि पोटांच्या समस्यांसाठी दोडक्याची भाजी खूप लाभदायक आहे. आयुर्वेदानुसार, अर्धी शिजलेली भाजी पोटाचे दुखणे दूर करते.

१३) दोडक्याचे सेवनसुध्दा आपली प्रकृती चांगली ठेवते. दोडक्यामुळे रक्तशुध्दीकरण होते. फुफ्फुसांसाठीसुध्दा गुणाकारी असते.