आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वेदना, ताप, सूज आणि लघवीतील बदल असे अनेक संकेत शरीर देत असते. ही गंभीर आजारांची लक्षणे आपण वेळीच ओळखून डॉक्टरांकडे गेले पाहिजे. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. शरीराने दिलेले संकेत ओळख्णयासाठी हे सायलेंट संकेत ओळखता आले पाहिजेत. याविषयी आपण महत्वाची माहिती येथे घेणार आहोत.
सूज येणे हे काही गंभीर आजाराचे लक्षण आहे. शरीरावर सूज येण्याचे कारण रक्ताची कमी, किडनी किंवा लिव्हरची खराबी किंवा शरीरात पाणी जमा होणारा अॅडिमा नामक आजार असू शकतो. तसेच युरीनमध्ये बदल हा देखील शरीराने दिलेला गंभीर आजाराचा संकेत आहे. युरीनचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे डायबिटीज किंवा प्रोस्टेट कॅन्सरचे कारण ठरू शकते. युरीनचा डार्क यलो कलर लिव्हरच्या खराबीमुळे असू शकतो. खाज किंवा स्किन रॅशेजसारख्या संकेतांनाही गांभीर्याने घेतले पाहिजे. अनेक दिवसांपासून होणारी खाज आणि रॅशेजकडे दुर्लक्ष करू नका.
हे डायबिटीज किंवा किडनी आणि लिव्हरच्या प्रॉब्लेममुळे होऊ शकते. असाच आणखी एक संकेत म्हणजे विनाकारण वजन कमी होणे. विनाकारण ५ किलोपेक्षा जास्त वजन कमी होणे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नये. विशेष म्हणजे आपल्या हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षरात बदल होणे हा देखील एक गंभीर आजाराचा संकेत आहे. एक पानावर लिहिताना प्रत्येक लाईनवर हँडरायटिंगमध्ये होणारा बदल पार्कींसन्स डिसीजसारख्या न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरचा संकेत असू शकतो. झोपेत दात वाजवणे हे स्टेस किंवा जास्त नशा केल्याने, औषधी घेतल्याने किंवा पोटातील जंतामुळे होऊ शकते.
तर दातांच्या मागील भाग कमजोर होण्याचे कारण अॅसिडिटीचा प्रॉब्लेम असू शकतो. जास्त दिवस अॅसिडिटीचा त्रास नुकसानदायक आहे. वारंवार डायरिया किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास कोलोन किंवा ओव्हरियन कॅन्सर होण्याचा धोका राहतो. जास्त घाम आल्यामुळे हायपरहायडोसीस नावाचा आजार किंवा थायरॉइडची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच थकवा किंवा कमजोरी हे लक्षणदेखील दुर्लक्ष करण्यासारखे नाही. अॅनिमिया, डायबिटीज, थायरॉइड प्रॉब्लेम, डिप्रेशन, ताप यासारख्या आजारांमुळे थकवा आणि कमजोरी होऊ शकते.