आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वाईन फ्लू हा जीवघेणा आजार आहे. याची लक्षणे आढळताच वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजेत. तसेच हा आजार होऊ नये म्हणून योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. एन्फ्लुएंझाए वायरस एच१ एन१ असे त्याचे नााव आहे. आतापर्यंत २० अंश सेल्शिअसच्या वर तापमान गेले की हे विषाणू मरून जात होते. परंतु आता उन्हाळ्यात सुद्धा हे विषाणू तग धरू लागले आहेत. या विषाणूने स्वत:मध्ये बदल करून वातावरणासोबत अनुकूल करून घेतल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
ही आहेत लक्षणे
१. ताप येणे
२. खूप थकवा जाणवणे
३. नाक वाहणे
४. गळा कोरडा होणे
५. धाप लागणे व खोकला
६. भूक न लागणे
७. स्नायूंमध्ये दुखणे
८. डायरिया
९. उलटी
अशी घ्या काळजी
१. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
२. हात गरम पाण्याने वारंवार हात धुवा. हात नेहमी स्वच्छ ठेवा.
३. शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवा.
४. भरपूर झोप घ्या. दररोज आठ तास झोप घ्या.