आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील हार्मोन्स जास्त किंवा कमी प्रमाणात डिसचार्ज होण्याला हार्मोनल असंतुलन म्हणतात. 70 टक्के महिला या हार्मोन्स असंतुलनाकडे दुर्लक्ष करतात. महिलांना या समस्येचा सर्वाधिक त्रास होतो. यामुळे पुढे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. यासाठी शरीरात हार्मोन्स बॅलन्स राहणे आवश्यक असते. बदलेली जीवनशैली आणि अयोग्य आहार, भावनिक चढउतार आदी कारणे यापाठीमागे असतात. महिलांच्या हार्मोन्स असंतुलनाचे कोणते संकेत आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत संकेत
1 जास्त भूक
अचानक जास्त भूक लागत असेल तर हा हार्मोन्स असंतुलित होण्याचा इशारा आहे.
2 डिप्रेशन
हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेक महिलांना तणावाचा सामना करावा लागतो. जर वेळेवर उपाय केले नाही तर डिप्रेशन होऊ शकते.
3 शारीरिक संबंधात कंटाळा
हार्मोन्समध्ये बदल झाल्याने शरीरातील एस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्याने शारीरिक संबंध ठेवण्यास रस राहत नाही.
4 स्मरणशक्ती
हार्मोन्सच्या बदलामुळे अनेक महिलांची स्मरणशक्ती कमी होण्याची समस्या होऊ शकते.
5 पिंपल्स
पुन्हा पुन्हा पिंपल्स येत असल्यास व बरे होत नसल्यास हार्मोन्समध्ये बदल झालेला असू शकतो.
6 राग, चिडचिडेपणा
हार्मोन्स असंतुलित झाल्याने स्वभवा चिडखोर होतो. छोट्या छोट्या गोष्टींवर संताप येतो.
7 झोप कमी, थकवा
सतत झोप येणे, थकवा जाणवणे, याचे कारण हार्मोन्समध्ये झालेले बदल असू शकते.
8 जास्त घाम
जास्त घाम येत असल्यास हार्मोन्समधील बदल हे कारण असू शकते.