बहिरेपणा
सतत मोठ्या आवाजात हेडफोनने गाणी ऐकल्याने कान दुखण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यामुळे बहिरेही येऊ शकता. हेडफोन ऐकताना कान दुखणे हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते.
आरोग्यासाठी घातक
हेडफोन हे व्यसन झाले आहे. काहींना हेडफोन लावले नाही तर डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. सततच्या हेडफोनमुळे लहानलहान आवाज ऐकू येणे बंद होते. मोठ्या आवाजात बोलण्याची सवय लागते. रात्री नीट झोपही लागत नाही.
सौंदर्याला मुकणे
हेडफोनमुळे निसर्गातून येत असलेल्या असंख्य सुरांना आपण मुकतो. कमी आवाजात आणि गरज असेल तेव्हाच हेडफोनचा वापर केला पाहिजे.
ऐकण्याची क्षमता
९० डेसिबलपेक्षा जास्त आवाज ऐकणे कानांसाठी हानिकारक असते. याकडे दुर्लक्ष करु नका. त्यापेक्षा जास्त आवाज वाढवू नका. अन्यथा लवकच ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
इन्फेक्शनचा धोका
हेडफोन इतरांसोबत शेअर करु नका. यामुळे आजारांचे संक्रमण होऊ शकतो. हेडफोन आधी नीट स्वच्छ करावे मगच कानात घालावे.