आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Side Effects Of Turmeric | हळद हा एक असा मसाला आहे, जो भारतातील प्रत्येक घरामध्ये सहज आढळतो, अनेकदा आपण त्याच्या फायद्यांबद्दल ऐकतो, कारण ती प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधांसाठी ओळखले जाते. इतर अनेक प्रकारचे मसाले आहेत, पण हळदीची गणना सर्वात प्रसिद्ध मसाल्यांमध्ये होते (Side Effects Of Turmeric). जखम सुकवण्यासाठी रात्रीच्या वेळी दुधासोबत याचे सेवन केले जाते. तसेच उच्च रक्तदाब आणि एलडीएल (LDL), रक्त प्रवाह, शरीरातील पेशी तुटणे यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु तुम्हाला त्याचे नुकसान माहित आहे का. हळदीचे अति सेवन आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते हे माहित नसेल तर जाणून घेऊया (Healthy Tips).
1. किडनी स्टोनसाठी नुकसानकारक (Possibility Of Kidney Stones)
हळदीचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात, पण जर आपण तिच्या फायद्यांचा विचार करून तिचे अधिक प्रमाणात सेवन केले तर त्यात असलेल्या ऑक्सलेटच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरात खडे तयार होऊ लागतात आणि आपण स्टोनला बळी पडतो. म्हणून, सेवन करण्यापूर्वी, त्याचे प्रमाण जाणून घ्या, त्यानुसार सेवन करा.
2. अतिसाराची समस्या (Turmeric Can Cause Diarrhea)
नेहमीच बाहेरच्या अन्नामुळे जुलाब होत नाहीत, पण जास्त हळद खाल्ल्याने ही समस्या वाढू शकते, कारण त्यात कर्क्युमिन असते, जे आपल्या पोटातील गॅस्ट्रिक डक्टला व्यवस्थित काम करण्यापासून रोखते, ज्यामुळे डायरियाची समस्या सुरू होते. (Side Effects Of Turmeric)
3. आयर्नची कमतरता (Turmeric Can Reduce Iron Level)
शरीराला आवश्यक असलेली व्हिटॅमिन, मिनरल्स आणि आयर्न आजकालच्या खाण्यापिण्यातून आपल्या शरीराला मिळत नाही.
त्यामुळे आपल्याला आजारांनी घेरले आहे, शरीरात आयर्न कमी असल्याने रक्ताची कमतरता जाणवते.
परंतु हळदीचे जास्त सेवन केल्याने शरीरातील लोह सुकू लागते, ज्यामुळे अशक्तपणासोबतच इतर समस्याही वाढू शकतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Side Effects Of Turmeric | eating too much turmeric will create health issue know the right quantity of eating haldi
Diabetes च्या रूग्णांसाठी रामबाण आहे घरातील ‘हा’ मसाला, जाणून घ्या कसा करावा वापर
Headache Solution | नेहमी डोकेदुखीने होत असाल त्रस्त तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी करा उपचार; जाणून घ्या