आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दुपारी झोपण्याची सवय अनेकांना असते. जेवण झाले की थोडावेळ झोप काढल्याशिवाय अशा लोकांना करमत नाही. मात्र, दुपारच्या थोडा वेळच्या झोपेमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांविषयी जाणून घेवूयात.
त्वचा रोग
कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.
फॅट्स वाढतात
शरीरातील फॅटस म्हणजेच मेदाचे प्रमाण वाढते, अतिप्रमाणामुळे वजन वाढू लागतं, वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.
कफदोष
दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.
मधुमेह
दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. तुम्हाला मधूमेह होण्याची शक्यता देखील वाढते.