आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ज्या लोकांचे केस कुरुळे असतात ते केस स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनरचा उपयोग करतात. हेयर स्ट्रेट केल्याने केसांवर केमिकलचा वापर केला जातो. ते अनेक लोकांना सुट होत नाही. त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. जाणून घ्या हेयर स्ट्रेटनिंगचे केसांवर होणारे परिणाम –
केसांमधील आर्द्रता कमी होते –
केसांचे स्ट्रेटनिंग करीत असताना हलका धूर केसांतून निघताना पाहायला मिळतो. पण हा धूर नसून ही वाफ असते. केसांचे स्ट्रेटनिंग करीत असताना केसांमधील आर्द्रता वाफ बनून बाहेर पडत असते.
केसांच्या मुळांना इजा –
स्ट्रेटनिंगच्या प्रक्रियेमुळे केसांमधील नैसर्गिक तेले नाहीशी होऊन केसांची चमक नाहीशी होते. स्ट्रेटनिंग करीत असताना केसांना उपकरणांच्या मदतीने उष्णता दिली जाते. या उष्णतेमुळे केसांनाच नाही तर केसांच्या मुळांनाही इजा पोहोचू लागते.
डोक्याच्या त्वचेवर अॅलर्जी –
हेयर स्ट्रेट करण्यासाठी जे प्रोडक्ट वापरले जाते, त्यामुळे डोक्याच्या त्वचेवर अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
केस अधिकच रुक्ष बनतात-
स्ट्रेट केल्याने केस कोरडे पडतात. हेयर स्ट्रेटनिंगमुळे केस अधिकच रुक्ष बनतात. याव्यतिरिक्त आयर्निंगमुळे तुमचे केस तुटतील.
केस गळणे-
पार्लरमध्ये जर कमी प्रतीचे प्रॉडक्ट वापरले असतील तर केस गळणे सुरु होईल.