जास्त ‘चहा’ पिता ? तर तुमच्यासाठी आहे ‘ही’ बातमी, ‘कँसर’शी आहे कनेक्शन
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जास्त चहा प्यायल्याने कँसर सारख्या गंभीर आजाराची शक्यता वाढते, असे संशोधनात आढळून आले आहे. तसेच चहाचे इतरही अनेक दुष्परिणाम होतात. एका दिवसात तीन कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये, असे तज्ज्ञ सांगातात. चहा पिण्याचे दुष्परिणाम आणि कोणती काळजी याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
१ जास्त गरम चहा पिल्याने तोंडापासून पोटापर्यंत असलेल्या नलिका डॅमेज झाल्याने कँसर होऊ शकतो.
२ चहामध्ये फ्लोराईड असते. जास्त चहा प्यायल्याने हाडे कमजोर होतात.
३ जास्त चहा प्यायल्याने वारंवार लघवीला होते. यामुळे सोडियम, पोटॅशियमसारखी तत्वे शरीरातून बाहेर जातात. कमजोरी वाढते.
४ चहामध्ये टॅनिन, टायलिन असते. यामुळे पोटाच्या समस्या वाढतात.
५ चहामध्ये कॅफिन असते. सतत प्यायल्याने थकवा वाढतो, डोकदुखी होते.
ही काळजी घ्या
* चहा पावडर, दूध आणि साखर एकत्र उकळून घेऊ नका. पहिले पाणी उकळा. यानंतर चहा पावडर टाका. शेवटी दूध टाकावे.
* चहाचे पाणी एकदाच उकळावे. तीन मिनिटांपेक्षा जास्त चहा उकळल्याने पाण्यात ऑक्सीजनची कमतरता येते. चहाची टेस्ट बिघडते.
* चहापत्ती नेहमी उकळत्या पाण्यात टाकावी. यामुळे चहाचा रंग आणि फ्लेव्हर दोन्हीही चांगले येते.
* अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ ठेवलेला चहा पिऊ नका. यामुळे इनडायजेशन होऊ शकते.
Comments are closed.