नाश्त्यासाठी मुलांना रोज ‘ब्रेड-जॅम’ खायला देतायं ? मग ही बातमी नक्की वाचा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्रेड-जॅम हा अनेक लहान मुलांचा आवडता नाश्ता असतो. अनेक जॅम बनवणाऱ्या कंपन्या टीव्हीवर जाहिरातीत सांगताना दिसतात की जॅममध्ये फ्रूट्स असतात, न्यूट्रिएंट्स असतात तसेच जॅम मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत हेल्दी असतात. पालकही त्या जाहिरातींना भुलून बळी पडतात. मात्र जॅम सतत खाणे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. काही फळांमध्ये व्हिटामिन सी असते जे जॅम तयार करताना नष्ट होते. जाणून घ्या सतत जॅम खाण्याचे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –
लठ्ठपणा –
जॅम तसेच सॉससारख्या प्रिझर्व्ह केलेल्य खाद्य पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अधिक प्रमाणात जॅम खाणे लठ्ठपणाला निमंत्रण देते. लठ्ठपणामुळे भविष्यात हृदयरोगाचाही धोका वाढतो.
चरबीचे प्रमाण वाढते –
ब्रेड बनवण्यासाठी मैदा वापरला जातो. मैद्याचे पचन करण्यासाठी शरीरातील मॅग्नेशिअम वापरलं जातं आणि ते लवकर भरून काढता येत नाही. मैद्यामुळे शरीरात मेद धातू मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागते. त्यामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी वाढते.
फळांमधील पोषक तत्त्वे नष्ट होतात –
जॅम तायर करण्यासाठी फळे ही शिजवून त्यात साखर मिसळली जाते. फळे शिजवल्यानंतर त्यातील पाण्याचा स्तर कमी होतो तसेच त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. काही फळांमध्ये व्हिटामिन सी असते जे जॅम तयार करताना नष्ट होते.
पोटाच्या समस्या निर्माण होतात –
बेकरीचे पदार्थ बनवताना आंबवण्याची जी प्रक्रिया केली जाते त्यामुळे अॅसिडिटी, छातीत, पोटात आग होणं यांसारख्या समस्या निर्माण होतात.
Comments are closed.