जाणून घ्या – सौंदर्यवर्धक ‘शिया बटर’ कसे बनवले जाते

butter

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आपल्या सौंदर्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधने वापरतो. त्यातील अनेक प्रसाधनांमध्ये शिया बटर मिक्स आहे असं सांगितलं जात. पण हे शिया बटर नेमकं काय आहे. यामुळे आपल्या त्वचेला काय फायदा होतो. याचे अजून काय फायदे आहेत का हे अनेकांना माहित नाही. त्यामुळे याचे नेमके काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेऊया.

काय आहे शिया बटर –

शिया ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीला जे फळ येते त्यापासून बटर काढले जाते. या बटरचा उपयोग जेवणात केला जातो. तसेच यापासून अनेक क्रीम आणि मलम तयार केले जातात. या झाडाच्या लाकडाचा उपयोग इंधनासाठी केला जातो.

शिया बटरचे फायदे –

शिया बटर हे स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. हे स्किन सेल्समध्ये वेग वाढवण्यास मदत करते. शिया बटरचा वापर केल्याने आपली त्वचा कोमल आणि मुलायम होते. तसेच सेन्सेटिव्ह स्किनसाठी ही शिया बटर फायदेशीर आहे.

तुमचे ओठ जर ड्राय होत असतील तर तुम्ही शिया बटरचा उपयोग करू शकता. कारण शिया बटर हे आपल्या ओठांना चांगले पोषण देते. त्यामुळे शिया बटर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

शिया बटरमध्ये काही एंटी-एजिंग आणि मॉइश्चराइजिंग गुण असतात. जे आपल्या शरीरातील कॉलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात. याशिवाय शिया बटर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतात. आपल्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेवरील सुरकुत्या, स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होते. त्यामुळे शिया बटरचे आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी खूप फायदे आहे.