डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा
आरोग्यनामा ऑनलाइन – डँड्रफचा त्रास अनेकांना होतो. यासाठी अनेक प्रॉडक्ट बाजारात मिळतात. मात्र, यापैकी अनेक प्रॉडक्टचा काही एक उपयोग होत नाही. उलट केसांची हानी होऊ शकते. केसातील कोंडा या समस्येवर काही घरगुती उपाय केल्यास जलद फायदा होऊ शकतो. यासाठी आपल्या शॅम्पूमध्ये काही घरगुती पदार्थ मिसळले की तुम्ही हा उपाय करू शकता. हे कोणते उपाय आहेत, त्याविषयी माहिती घेवूयात.
शॅम्पू अधिक प्रभावी करण्यासाठी त्यामध्ये काही मिसळले तर तो जास्त प्रभावी होईल. शॅम्पूमध्ये लिंबूचा रस मिसळल्याने कोंडा सहज दूर होतो. शॅम्पूमध्ये मध मिसळून लावल्याने केस गळणे पूर्णपणे बंद होते. आवळ्याचा रस शॅम्पूसोबत मिक्स केल्याने कोंडा पूर्णपणे दूर होतो. गुलाब जल शॅम्पूमध्ये मिक्स करुन लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो. शॅम्पूमध्ये ग्रीन टी मिसळल्याने केस गळणे थांबते. यामुळे केस दाट होतात. शॅम्पूमध्ये एलोवेरा ज्यूस मिसळून लावल्याने खाज दूर होते. ऑलिव्ह ऑइल शॅम्पूमध्ये मिसळून लावल्याने केसांची चमक वाढते. बारीक केलेली साखर शॅम्पूसोबत मिसळून लावल्याने केस मुलायम,चमकदार होतात.