आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. मात्र, ही भाजी आपल्याकडे जास्त प्रमाणात खाल्ली जात नाही. या भाजीत भरपूर प्रमाणात असलेले पॉटॅशियम आणि कॅल्शियम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हरभऱ्याची भाजी खाण्याचे फायदे आणि ती कशी खावी, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
अशी खा भाजी
* हरभऱ्याच्या पानांची पेस्ट बनवून याची भाजी बनवा आणि मक्क्याच्या भाकरीसोबत खा.
* हरभऱ्याची भाजी डाळीसोबत मिक्स करुन बनवू शकता.
* हे मेथी किंवा पालकसोबत मिक्स करुन बनवा आणि खा.
* ही बाजरीची भाकरी किंवा मेथी पराठ्यासोबत खाऊ शकता.
* हरभऱ्याची भाजी अद्रक आणि लसुणसोबत बनवा.
हे आहेत फायदे
* हरभऱ्याच्या भाजीमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅलशियम असते. यामुळे हाडे आणि मसल्स मजबूत होतात.
* यातील कार्बोहायड्रेटमुळे कमजोरी दूर होते, भरपूर उर्जा मिळते.
* यामध्ये कोलेस्टेरॉल नसते. हे हार्टच्या आजारात बचाव करते.
* यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
* यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची तक्रार दूर होते.
* यातील कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते. केस काळे आणि दाट होतात.
* यातील आयर्न हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते.