आरोग्यनामा ऑनलाईन टीम – संवेदनशील त्वचेची काळजी घेणे खरचं खूप जिकिरीचे आहे. पिंपल्स , लाल डाग, खाज तसेच विविध ब्युटी प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचा लगेच रुक्ष होते. तसेच वातावरणातील बदल यांमुळेही चेहऱ्यावर परिणाम दिसतात. संवेदनशील त्वचेची काळजी काही घरगुती उपाय करून घेता येईल. जाणून घ्या याबद्दल
१) एलोवेरा जेल : एलोवेरा जेल संवेदनशील त्वचेसाठी नैसर्गिक घरगुती उपाय आहे. एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन ई तसेच स्मूथनिंग प्रॉपर्टीज असल्याने खाज आणि चेहऱ्यावरचे लाल डाग जातात. रोज रात्री किंवा सकाळी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावले पाहिजे.
२) मध : मध हे सर्वात सोप्पे, स्वस्त, आणि लवकर उपलब्ध होणारे आहे. मधामध्ये अँटीबॅक्टरीअल प्रॉपर्टीज असल्याने त्वचेची आग होत नाही. तसेच त्वचा मॉइश्चराइज होण्यास मदत होते.
३) केळ : पिकलेल्या केळ्यात एक चमच दही आणि मध मिक्स करून लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो तसेच चेहऱ्यावर तेज येते. चेहरा तजेलदार दिसतो.
४) हळद : हळदीमध्ये अँटिसेप्टिक गुण असल्याने हळद आंतपेशींना उत्तेजित करून चेहऱ्यावर तेज येते तसेच रंग उजळतो. एक चमच हळद कच्च्या दुधात घालून लावावी.
५) ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडेंट्सचे तत्व असल्याने तो क्लिंझिंगचे कामकरतो. ग्रीन टी त्वचेस पुनर्जीवित व तरुण दिसण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये चहाची पत्ते टाकून गरम पाण्यात उकडावे व ते प्यावे. तसेच ग्रीन टी मधात मिक्स करून चेहऱ्यास लावावी.
६) नारळतेल : नारळ तेल चेहऱ्यावर लावल्याने ते पोर्सच्या खोलपर्यंत जाऊन त्वचेस आतून मॉईस्ट करते व त्वचा ग्रेसफुल दिसते.