आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कोथिंबीर जेवणाला स्वादिष्ट तर बनवतेच त्याच बरोबर आरोग्यासाठीही कोथिंबीर फायदेमंद असते. प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट, मिनरल्स, आयर्न अशी पोषण तत्त्वे मोठ्या प्रमाणात कोथिंबीर मध्ये आढळतात. जो शरीर स्वस्थ ठेवण्यात खूप मदत करते.
कोथिंबिरच्या सेवनाने पोटाचे आजारही दूर होतात. कोथिंबीर मध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठी हे उत्तम मानले जाते. ज्या मुलांमध्ये वयाच्या आधीच दृष्टीक्षेप कमी झाली आहे त्या मुलांसाठी नियमित कोथिंबीर सेवन चांगले असते.
मस दूर करण्यासाठीही कोथिंबिरीचा उपयोग केला जाऊ शकतो. कोथिंबिरचा पेस्ट तयार करून मसांवर नियमित लावल्याने मसांची समस्या दूर होते. त्याच बरोबर तेलकट त्वचेसाठी कोथिंबिरीची पेस्ट आणि दही मिसळून लावल्याने त्वचेचा तेलकटपणा दूर होतो.
आजकाल खूप लोकांमध्ये दम्याचा आजार आढळतो. या त्रासाला दूर करण्यासाठीही कोथिंबिरचा वापर करू शकतो. कोथिंबीर आणि मिश्री सम प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करून घ्या. याचा १ चमचा तांदळाच्या पाण्यात मिसळून घेतल्याने दम्याचा आजार कमी होतो.