बैठे काम देते कर्करोगासह अनेक आजारांना निमंत्रण ! ‘का’ ते जाणून घ्या
जास्त वेळ बसू नका
सकाळी घाम गळेपर्यंत व्यायाम केल्यानंतर दिवसातील आठ तास बसून काम केले जाते. त्यानंतर रात्रभर झोप काढली जाते. आणि जे व्यायामही करत नाहीत, त्यांची तर आणखी गंभीर स्थिती असते. व्यायाम महत्त्वाचा आहेच, पण जास्त वेळ बसणे चुकीचे आहे. माणसाने कमी बसले पािहजे. उभे राहण्याला अनवट मानले जाते, तसेच बसून राहण्याच्या संबंधात झाले पाहिजे, असे अमेरिकेचे संशोधक डॉ. जेम्स लेिव्हने यांनी म्हटले आहे.
या रोगांचा वाढतो धोका
सतत बसण्याने आरोग्य ढासळते, हृदयासंबंधी विकार, मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब आदी आजार होऊ शकतात, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे. जास्त बसण्याने शरीराची हालचाल कमी होते. रोजच्या हालचाली व कर्करोगाच्या प्रमाणाचे विश्लेषण संशोधकांनी केले असता असे आढळून आले की, दिवसा जास्त वेळ बसणाऱ्यांना आतडीच्या कर्करोगाचा २४ टक्के, गर्भाशयाच्या कर्करोगाचा ३२ टक्के, फुफ्फुसांच्या कर्करोग धोका २१ टक्क्यांहून अधिक असतो. किती वेळ व्यायाम करता याचा त्यावर काही फरक पडत नाही. जे जेवढा वेळ जास्त बसले तेवढाच वेळ व्यायाम करूनसुद्धा त्यांच्या फिटनेसच्या स्तरात घट झाल्याचे दिसून आले. म्हणजेच बसून राहण्याने व्यायाम वाया जातो, असेही म्हटले जाते.
अवघ्या ३०० कॅलरी बर्न होतात
मानवी शरीर चालण्यासाठी बनलेले आहे. सक्रिय शरीराच्या काही गरजादेखील असतात. आपण ज्या कॅलरीज घेतो, त्या प्रत्येक पेशी आपले निर्धारित काम करण्यासाठी जाळतात. बसण्याने पूर्ण व्यवस्था हळू होते. शारीरिक यंत्रणेची सक्षमता कमी होते. शेवटी पेशी आळशी बनतात आणि निष्क्रिय शरीराला सुस्त करतात. खुर्चीवर बसून दिवसभर काम करणारे लोक जास्तीत जास्त ३०० कॅलरी जाळतात. त्यांच्या तुलनेत बहुतांश उभे राहण्यात आणि चालण्यात वेळ घालवणारा एखाद्या रेस्टॉरंटचा वेटर रोज १३०० कॅलरी खर्च करतो.
कार्यशैलीत बदल करा
यासाठी नोकरीत बदल करण्याची गरज नाही. नेहमीच्या कार्यशैलीत बदल करून रोज ५०० ते १००० कॅलरी खर्च करता येतात. खुर्चीवर बसून राहण्याऐवजी पायांचा जास्त उपयोग करावा. जास्त वेळ बसून राहणारे, परंतु व्यायामाने फिटनेस मिळवणारांमध्ये स्थूलता आणि जास्त कोलेस्टेरॉल असल्याचे आढळलेले नाही.
चरबी वाढते
बसलेले असताना शरीर ऊर्जा खर्च करत नाही. त्यामुळे माणसाला चालवणारे आणि कॅलरी खर्च करणारे सिग्नल संथ होऊ लागतात. त्यांना काम न दिल्यामुळे शिथिल होतात. अशा वेळी चरबी बनवणारी प्रक्रिया काम करू लागते. अशा परिस्थितीत खुर्चीमधून उठणेदेखील कठीण होऊन बसते. शारीरिक सतर्कतेवर परिणाम होतो.
मेंदू देतो संकेत
बसलेले अथवा निष्क्रिय राहण्यास भाग पाडणारे संकेत मेंदूमधून बाहेर पडतात. प्राण्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे की, स्थूल उंदरांमध्ये एक स्विच असते, जे त्यांना नीट कॅलरीला दक्षतेने जळण्यापासून रोखते. याचे कारण अजून समजलेले नाही. परंतु सक्रिय अथवा निष्क्रिय करणारे संकेत वाचण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत.
ही दक्षता घ्या
* खुर्ची, टेबलचा वापर कमी करा. उभे राहून फोनवर बोला. बोलताना पायी चालत रहा.
* डेस्कवर पाण्याचा लहान ग्लास ठेवावा. रिकामा झाल्यावर तो भरण्यासाठी अधून-मधून उठावे.
* उभ्याने मीटिंग घेणे सुद्धा लाभदायक ठरू शकते.
Comments are closed.