पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – कोलकात्यामधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या १७ जूनरोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आहे आणि या आंदोलनाला वैद्यकीय क्षेत्राशिवाय इतर क्षेत्रातील लोकांनीही पाठिंबा द्यावा, असं आवाहन पुणे आयएमएने केलं आहे.
कोलकाता हल्ल्या तीव्र पडसाद देशभरात उमटत असून डॉक्टरांची आंदोलने अजूनही सुरूच आहेत. सरकारी तसेच खासगी डॉक्टरांनी या आंदोनातून आपला संताप व्यक्त केला आहेत. आता उद्याच्या संपातही मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी होणार आहे.
डॉक्टरांच्या उद्याच्या संपाला कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (COEP), BITS पिलानी स्टुडंट युनियन यासारख्या अनेक संस्थांनी पाठिंबा दिली आहे. डॉक्टरांच्य संपाबाबत माहिती देताना पुणे आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, नॉन मेडिको प्रोफेशनल्स आणि हाऊसिंग सोसायटीना आंदोलनाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संस्थेला आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल तर ते संपर्क साधावा. लोकांचे मोठ्याप्रमाणात समर्थन मिळाल्यास डॉक्टरांवरील हिंसाचाराबाबत जनजागृती लवकर होईल.