आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वाढते शहरीकरण, वाहनांची संख्या, औद्योगिकीकरण यांमुळे वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक जनजागृती मोहीम राबविल्या जात आहेत. काही अशा वनस्पतीही आहेत ज्या वातावरणातील प्रदूषण घटवण्यासाठी मदत करतात. या वनस्पतींमुळे प्रदूषण कमी होतेच शिवाय वातावरणातील ऑक्सिजनची पातळीही वाढते. जाणून घ्या वातावरणातील प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पतींबद्दल –
पिंपळ पिंपळाचे झाड विस्तार , परीघ आणि उंचीने जास्त असते. इतर झाडे दिवसा ऑक्सिजन देतात. मात्र पिंपळाचे झाड याला अपवाद आहे. जवळपास २२ तासांपेक्षा अधिक वेळ पिंपळाचे झाड ऑक्सिजन देते.
बांबूचे झाड बांबूचे झाड हे सर्वात वेगाने वाढणारे झाड आहे. बांबूचे झाड हवा शुद्ध करण्याचे काम करते. बांबूचे झाड इतर झाडांच्या तुलनेत ३० टक्के अधिक ऑक्सिजन सोडते.
कडुलिंब, वड, तुळस पिंपळाच्या झाडाप्रमाणेच कडुलिंब, वड, तुळस अधिक प्रमाणात ऑक्सिजन देतात. कडुलिंब, वड, तुळशीची झाडे दिवसात २० तासांपेक्षा जास्त ऑक्सिजन तयार करतात.
सागरी वनस्पती पृथ्वीचा अधिक भूभाग समुद्राने व्यापलेला आहे. त्यामुळे जमिनीवरील वनस्पतींपेक्षा सागरी वनस्पती सर्वाधिक ऑक्सिजन देतात. वातावरणात उपस्थित ऑक्सिजनपैकी ७० ते८० टक्के ऑक्सिजन या वनस्पतींद्वारे तयार होतो.
Comments are closed.