नवरात्रीत सैंधव मीठ (जाड मीठ) का खाल्लं जातं, जाणून घ्या त्याचे फायदे
बहुजननामा ऑनलाइन टीम – शारदीय नवरात्र उत्सवाला सुरवात झाली आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात संपूर्ण नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्गा मातेची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत बर्याच देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास ठेवतात. आपण उपवासासाठी बटाटा, मुळा, भोपळा आणि शिंगाड्याचे पीठ खात असतो. पण जर आपण मीठाबद्दल बोललो तर सामान्यऐवजी सैंधव मीठाचा(Sandhav salt) ( जाड मीठ) उपयोग केला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का व्रत असताना सैंधव मीठ(Sandhav salt) ( जाड मीठ) का वापरले जाते? तर याबद्दल जाणून घ्या
उपवसामध्ये सैंधव मीठ ( जाड मीठ) खाल्ले जाते_
साधारणपणे मीठ म्हणजे समुद्री मीठ. ते अनेक रसायनांच्या प्रक्रियेतून तयार केले जाते. आरोग्यासाठी ते पूर्णपणे व शुद्ध नसल्यामुळे फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे सैंधव मीठ ( जाड मीठ) पहाडी मीठ म्हणून ओळखले जाते. तसेच, हे मीठ कमी खारट आणि आयोडीनमुळे खूप शुद्ध आणि हलके असते. पौष्टिक गुणधर्मांमुळे, आरोग्याची सैंधव मीठ चांगले आहे. सैंधव मीठ (जाड मीठ) कोणत्याही उपवासात वापरले जाते. तर चला आता जाणून घेऊया सैंधव मीठाचे(जाड मीठ) फायदे …
१)सैंधव मीठामध्ये (जाड मीठ) आयोडीनचे प्रमाण कमी असते यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवते.
२)डोळ्यांभोवती झालेली सूज कमी होते.
३)शरीराला सर्व योग्य घटक सहज मिळतात.
४)पाचनतंत्र मजबूत होऊन पोट संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो
५)दिवसभर शरीरात ऊर्जा निर्माण राहते.
६) तणाव आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
७) भूक कमी लागते व वजन वाढण्याची समस्या देखील दूर होते.
८) रक्तभिसरण चांगले होऊन शरीरातील विषाणू घटक बाहेर टाकले जाते.
९)स्नायूंना मजबुती मिळून सांधे आणि शरीराच्या इतर भागामध्ये होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो.
१०) ज्या लोकांना मुतखड्याची समस्या आहे. सैंधव मीठात (जाड मीठ) काही थेंब लिंबू मिसळल्याने खडा वितळण्यास मदत होते.
Comments are closed.