Sandalwood Oil | टेन्शन, अस्वस्थता आणि कॅन्सरपासून वाचवते ‘या’ विशेष लाकडाचे तेल, घरी कसा करावा वापर? हे जाणून घ्या

Sandalwood Oil | sandalwood oil health benefits keeps stress away reduces anxiety skin cancer acne treatment

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Sandalwood Oil | त्वचा (Skin) आणि केस (Hair) नैसर्गिकरित्या सुधारण्यासोबतच चंदन (Sandalwood) आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. आजकाल, चंदनाचे तेल अनेक परफ्यूम आणि रूम फ्रेशनरमध्ये देखील वापरले जाते. शतकानुशतके पारंपारिक आणि आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Medicine) बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. चंदनाचे तेल (Sandalwood Oil) आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर मात करू शकते हेही अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे.

 

चंदनाच्या तेलाचे फायदे (Benefits of Sandalwood Oil)
अमेरिकन हेल्थ वेबसाइट Healthline.com मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, पारंपारिक चिनी औषधांसोबत, चंदनाचे तेल (Sandalwood Oil) भारतातील आयुर्वेदिक औषधांमध्ये विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते, जसे की – सर्दी (Cold), पचन समस्या ( Digestion Problems), मानसिक रोग (Mental illness), स्नायू समस्या (Muscle Problems), लिव्हर (Liver) आणि गॉल ब्लॅडरशी (Gallbladder) संबंधीत समस्या.

 

1. Anxiety दूर करते चंदन तेल
कोरोना व्हायरस महामारीमुळे (Coronavirus Infection) आजकाल लोकांमध्ये चिंता आणि अस्वस्थतेची समस्या (Anxiety Problems) अधिक दिसून येत आहे. कॉम्प्लिमेंटरी थेरपीज इन क्लिनिकल प्रॅक्टिसच्या रिसर्च (Complementary Therapies in Clinical Practice Research) रिपोर्टनुसार, चंदनाच्या तेलाने Aromatherapy मसाज केल्याने Anxiety दूर होण्यास मदत होते. तसेच तणाव कमी होतो.

 

2. जखमा भरण्यास उपयोगी (Useful for Wound Healing)
जर्मनीतील एका युनिव्हर्सिटीच्या रिसर्च रिपोर्टनुसार, त्वचेला दुखापत झाली असेल किंवा कोणत्याही प्रकारची जखम असेल तर चंदनाच्या तेलाने ती लवकर बरी होण्यास (Wound Healing) मदत होते. कारण हे तेल त्वचेच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते.

 

3. स्कीन कॅन्सरपासून होतो बचाव (Skin Cancer Prevention)
अर्काइव्हज ऑफ बायोकेमिस्ट्री अँड बायोफिजिक्समधील (Archives of Biochemistry and Biophysics) अभ्यासानुसार, चंदनाचे तेल त्वचेच्या कर्करोगाशी (Skin Cancer) लढण्यासाठी देखील मदत करू शकते. चंदनाच्या तेलामध्ये α-santalol नावाचे संयुग असते जे कर्करोगाच्या पेशी (Cancer Cells) नष्ट करण्यास मदत करते.

4. मुरुमांपासून बचाव करते चंदन तेल (Sandalwood Oil Protects Against Pimples)
चंदनाचे तेल त्याच्या अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे (Anti-inflammatory Properties) मुरुमांवर उपचार करण्यास देखील मदत करते. ते त्वचा आतून स्वच्छ करते ज्यामुळे मुरुमांची समस्या (Acne Problem) होत नाही.

 

घरी चंदनाचे तेल कसे वापरावे (How to Use Sandalwood Oil at Home) ?

चंदनाचे तेल घरी Aromatherapy द्वारे या 5 प्रकारे वापरू शकता

चंदनाचे तेल थेट त्वचेवर लावा.

लोशनमध्ये तेलाचे काही थेंब वापरा.

पाण्यात चंदनाच्या तेलाचे काही थेंब टाकून ते गरम करा, असे केल्याने त्याचा सुगंध घरभर पसरेल.

Oil Infuser च्या मदतीनेही या तेलाचा सुगंध घराच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचवता येतो.

आंघोळीच्या पाण्यात चंदनाचे तेल मिसळा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Sandalwood Oil | sandalwood oil health benefits keeps stress away reduces anxiety skin cancer acne treatment

 

हे देखील वाचा

 

Cholesterol Level | ‘या’ औषधी वनस्पतींच्या सेवनाने ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ 2 दिवसात शरिराबाहेर पडेल; जाणून घ्या काय करावं लागेल

Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी