पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – पायाचे दुखणे हि अनेकांसाठी खूप मोठी समस्या होऊन बसली आहे. सध्या अगदी ३० ते ३५ वयोगटातील व्यक्तींना पायाच्या समस्येने ग्रासले आहे.याला सर्वात मोठे कारण म्हणजे वाढते वजन आहे. परंतु यावर आपण योग्य तो उपचार केला तर हि समस्या कमी होऊ शकते. पण आपण बऱ्याचदा हि समस्या दूर करण्यासाठी किंवा याच्यावर उपचार म्हणून आपल्याला स्लीपर वापरण्याचा सल्ला अनेक जण देतात. मग आपण स्लीपर वापरायला लागतो. परंतु या स्लिपरमुळे आपल्या पायच्या नसा ताणतात. आणि आपल्याला चालायला त्रास होतो.त्यामुळे आपण स्लीपर वापरणे कटाक्षाने टाळले पाहिजे.
पायाच्या दुखण्यासाठी आपण बाजारातील विविध प्रकारच्या चप्पल खरेदी करतो. परंतु त्या चप्पलमुळे आपल्या पायाच्या वेदना कमी होत नाहीत. तर अजून जास्त वाढतात. हे सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. स्लीपर चप्पल वापरल्याने पायाला त्रास तर होतोच पण पाठही दुखते. अशी माहिती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील The Wake Forest Baptist Medical Center च्या डॉक्टर क्रिस्टीना यांनी दिली आहे.
त्यामुळे पायाच्या दुखण्यासाठी किंवा पाय दुखू नये. म्हणून आपण जी स्लीपर चप्पल वापरतो. ती वापरणे टाळा आणि. पाय किंवा टाच दुखत असेल तर एक वाटीत पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवा. त्याचा पूर्णपणे बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहा. सुरवातीला खुप थंड वाटते. परंतु, नंतर पायाला आराम मिळतो. आणि नियमित व्यायाम केल्यानेही हि समस्या ही कमी होऊ शकते.