• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home Food

‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत

by Nagesh Suryawanshi
July 6, 2019
in Food
0
‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत
0
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जेवणासोबत सॅलड घेणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. यामुळे जेवण कमी जाते आणि वजनही नियंत्रणात राहते. लवकर पोट भरण्याच्या इतर पद्धती म्हणजेच सँडविच, चिप्स यामध्ये मेद असतात. तसेच मोठ्या प्रमाणात कॅलरी असतात. बटाट्याच्या २५० ग्रॅम सॅलडमध्ये ५५० कॅलरी आणि ४५ ग्रॅम फॅट असते. बटाट्यामुळे कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. त्यापैकी बहुतांश ऊर्जा फॅट्समधून मिळते. कमी कॅलरी असणारे पदार्थ अधिक आरोग्यदायी असतात. यात कांद्याची पात आणि चवीनुसार लिंबू वापरू शकता.

२५० ग्रॅम सीझर सॅलडमध्ये ५५० कॅलरी आणि ४५ ग्रॅम फॅट असते. यापासून कॅल्शियम आणि प्रोटीन मिळते हे याचे वैशिष्ट्य आहे. उकडलेल्या अंड्यांपासून तयार केले जाते. यात लोणीही वापरता येते. हे पारंपरिक सॅलड आहे. त्याशिवाय पत्ता कोबीचा वापरही करता येतो.

२५० ग्रॅम ग्रीक सॅलडमध्ये २३२ कॅलरी आणि १९ ग्रॅम फॅट असते. बकरीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तरीही इतर अनेक पदार्थांच्या तुलनेत यात फॅटचे प्रमाण कमी असते. पण तेलकट पदार्थामुळे या सॅलडच्या फॅटमध्ये वाढ होते. कांद्याचा यात वापर केला जातो. ऑलिव्हमुळे मोनोसॅच्युरेटेड फॅट मिळतात. यात मिठाचे प्रमाण योग्य असते.
२५० ग्रॅम निकॉइस सॅलडमध्ये ४१३ कॅलरी, २१ ग्रॅम फॅट असते. यात काळे मिरे, टोमॅटे, ओवा आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ट्युना ताजी असेल तर त्यात ओमेगा-३ चे प्रमाणही भरपूर असते. यात ज्वालारोधक तत्त्वे असतात. त्यामुळे रक्ताच्या गाठी बनत नाहीत. हिरव्या फळभाज्या खाल्ल्यानेही हृदयरोगापासून दूर राहता येते.

२५० ग्रॅम टोमॅटो, कैरी, मोजेरेला सॅलडमध्ये ४२५ कॅलरी, ३७ ग्रॅम फॅट असते. या सॅलडमध्ये ऑलिव्हचे तेल वापरले जाते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य अत्यंत चांगले राहते. दिवसभरासाठी गरजेचे व्हिटॅमिन ईचे प्रमाणही यात भरपूर असते. टोमॅटोमुळे यातून अतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स मिळतात. हे ब्रेडबरोबर सर्व्ह करता येते. तो संतुलित आहार ठरू शकतो.

२५० ग्रॅम कोलेसलॉ सॅलडमध्ये ३६२ कॅलरी आणि ३१ ग्रॅम फॅट असते. कॅन्सरपासून बचाव करणारी पत्ताकोबी यात असते. हे सॅलड नियमित खाल्ल्याने कॅन्सरची शक्यता दूर होते. यात अंड्याचा पिवळा बलक वापरता येतो. त्यामुळे फॅटचे प्रमाण वाढते. तसेच ४० ग्रॅम इटालियन सॅलडमध्ये १० कॅलरी आणि फॅट अगदी नावापुरते यात केवळ पानांचा वापर केला जातो. यात इटालियन भाज्यांच्या लाल पानांचा वापर केला जातो. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, हे प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. ६० ग्रॅम इंग्लिश सॅलडमध्ये १० कॅलरी फॅट केवळ नावापुरते असते. यात अर्धी वाटी काकडी, टोमॅटो, पत्ताकोबी याचा वापर केला जातो. त्यामुळे पोषणही मिळते. सजावटीच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट सॅलड आहे.

Tags: arogyanamaBodydietdoctorFoodhealthआरोग्यआरोग्यनामाडॉक्टरव्यायामशरीर
पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या आणि अ‍ॅलर्जी
सौंदर्य

पावसाळ्यातील त्वचेच्या समस्या आणि अ‍ॅलर्जी

August 8, 2019
diet
Food

उन्हाळ्यातील त्रासांपासून वाचण्यासाठी : घ्या अशाप्रकारचा आहार

May 9, 2019
belly
फिटनेस गुरु

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हा’ खास उपाय, होईल फायदा

October 17, 2019
Arogyanama
माझं आराेग्य

‘जिरे आणि काळी मिरीचे दूध’ घेतले तर, होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या

August 21, 2019

Most Popular

water

एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे ? रोज 8 ग्लासची बाब किती खरी, जाणून घ्या

22 hours ago
Amchoor powder

तुम्हाला आमचूर पावडरबद्दल माहितीयं का ?, जाणून घ्या फायदे

2 days ago
fruit

‘हे’ फळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर, तुमच्या आहारात करा समावेश

2 days ago
dehydrated skin

जाणून घ्या, ड्राय आणि डिहायड्रेटेड स्किनमध्ये काय असतो फरक ?

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.