आरोग्यानामा ऑनलाईन टीम – विशिष्ट चव आणि गंध असलेले केशर विविध पदार्थांमध्य वापरले जाते. केशर गरम असल्याने साधारणपणे थंड हवामानात याचा वापर केला जातो. विशेष म्हणजे केशरमध्ये विविध औषधी गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून त्याचा वापर औषधामध्ये केला जात आहे. सौंदर्यवृद्धीसाठी केशर खुपच गुणकारी मानले जाते. केशरचा उपाय केल्यास त्वचा गोरी होते.
खरे केशर असे ओळखा
खरे केशर ओळखण्यासाठी ते पाण्यात टाकून पहावे. खरे केशर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते. केशर ओल्या कपड्यावर घासावे. केशर खरे असेल तर पिवळा रंग दिसेल आणि खोटे भेसळयुक्त असेल तर सुरुवातीला लाल आणि नंतर पिवळा रंग दिसेल.
हे आहेत उपयोग
* हिवाळ्यात कफ होत असेल किंवा हृदयाचा आजार असेल तर केशराचे सेवन करावे.
* पान मसाल्यात सुगंधासाठी केशराचा वापर केला जातो. हिवाळ्यात केशरयुक्त दूध प्यायल्याने त्वचा नितळ बनते.
* केशर, मध आणि बदाम एकत्र खाल्याने पुरूषांची वीर्यशक्ती वाढते.
* जखम झाली असेल तर त्यावर केशराचा लेप लावल्यास लवकर आराम मिळेल.
* केशर चंदनासोबत मिसळून कपाळावर लावल्यास डोळे आणि मेंदूला थंडावा मिळतो तसेच शरीरात स्फूर्ती राहते.
* डोकेदुखी दूर करण्यासाठी केशराचा उपयोग होतो. चंदन आणि केशर मिक्स करून हा लेप डोक्याला लावल्यास लवकर आराम मिळेल.
* नाकातून रक्त येत असेल तर यावर उपचारासाठी केशर उपयुक्त ठरते. चंदन आणि केशराचा लेप नाकावर लावल्यास नाकातून येणारे रक्त थांबेल.
* महिलांमधील अनियमित मासिक पाळी तसेच पाळी दरम्यान होणारा त्रास केशर सेवन केल्याने कमी होतो. गर्भाशयावर आलेली सूजही कमी होते.
* महिलांमधील उदासिनता कमी करण्यासाठीही केशर उपयोगी आहे. दररोज दोन केशर दूधात टाकून प्यावे.
* गर्भवती महिलेने केशर खाल्याने सुदृढ बालक जन्माला येते. बाळाची कांती उजळ होते.