हे उपाय करा
१) कांदा आणि लसूनचा रस पाण्यात मिसळून स्प्रेच्या बाटलीत भरा. नंतर पूर्ण घरात ते शिंपडा. काही वेळानंतर घरात डास राहणार नाहीत.
२) मोहरीच्या तेलात ओवा पावडर टाकून जाळा. याच्या धुरामुळे डास पळून जातात.
३) क्रीम, रोल-ऑन स्टीक, वाइप्स, लोशन मॉस्क्यूटो रेपेलेंट मशीन यांचा उपयोग करा. याचे अनेक फायदे आहेत.
४) दोन महिन्यांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांसाठी डीईईटी, पिकारिडिन सारखी तत्वे असलेली उत्पादने वापरा.
५) झोपण्याच्या खोलीत कापूर जाळा. १० मिनिटे घराची दारे-खिडक्या बंद ठेवा. सर्व डास नष्ट होतील.
६) एका दिव्यात केरोसीन आणि काही थेंब लिंबाचे तेल टाका. कापूरच्या दोन वड्या टाका. हा दिवा लावून ठेवल्यास डास नष्ट होतील.
७) जास्त डास असलेल्या ठिकाणी लिंबू आणि लवंगाचे पाणी शिंपडावे. डास पळून जातील.
८) रिकाम्या मॉस्किटो रेपेलेंट बॉटलमध्ये लिंबाचा रस आणि निलगीचे तेल भरून लावा.
९) लिंबाचे तेल हात-पायांना लावावे आणि त्यानंतर नारळाच्या तेलामध्ये लिंबाचे तेल मिळसून दिवा लावावा.
१०) सिट्रोनेला एक प्रकारची हर्ब असून याचा वास डासांना आवडत नाही आणि याची मेणबत्ती लावल्याने डास पळून जातात.
११) झोपताना लसणाची पाकळी चावून खाल्ल्याने डास चावत नाहीत. यासोबतच लसणामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.