आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावणे हा एक चांगला व्यायाम असून नियमित हा व्यायाम केल्यास आरोग्य चांगले राहते. लठ्ठपणासुद्धा कमी होतो. परंतु चुकीच्या पद्धतीने हा व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. योग्यपद्धतीने धावण्याचा सराव केल्यास कोलेस्टेरॉल कमी होते, तसेच आरोग्य चांगले राहते. यासाठी काही खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याविषयी जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
१) जास्त पाणी पिणे, बाथरूमला न जाणे
२) खुप जास्त खाणे
३) योग्य शूज न घालणे
४) अजिबात पाणी न पिणे
५) वॉर्मअप न करणे
६) वेगाने सुरूवात करणे