आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजारी असताना रोजच्याएवढा व्यायाम करु नका. रोज रनिंग करत असाल तर आजारी असताना केवळ वॉक करा. जास्त ताकद किंवा मेहनतीचा व्यायाम न करता सोपा योगाभ्यास करावा. व्यायाम करताना जास्त थकवा आला तर थोडा वेळ थांबून आराम करा. बरे वाटल्यावर व्यायाम करा. जिममध्ये अनेकजण येत असल्याकारणाने विषाणु सहज परसतात. यामुळे आजारी असताना व्यायामाचे वेगळे प्रकार घरीच करा.
या आजारात व्यायाम करू शकता
1 सायनसची समस्या असणे
2 शिंका येणे
3 सर्दी किंवा डोकेदुखी
4 घशात खवखव
5 कानात दुखणं किंवा तणाव असेल
तर करु नका व्यायाम
1 जास्त ताप असणे
2 मांसपेशींमध्ये वेदना
3 चक्कर येणे, छातीत वेदना
4 उलटी होणे
5 पोट बिघडले असताना